Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

akola news senior bjp mla govardhan sharma passed away devendra fadnavis nitin gadkari
akola news senior bjp mla govardhan sharma passed away devendra fadnavis nitin gadkari
social share
google news

Akola News Govardhan Sharma Passed Away : अकोल्यातील भाजपचे जेष्ठ आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma)  यांचे निधन झाले आहे. गोवर्धन शर्मा हे गेल्या अनेक वर्षापासून कॅन्सरशी झूंज देत होते. मात्र ही झुंज अपयशी ठरली असून त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘लालाजी’ या नावाने प्रसिद्ध असलेले शर्मा यांनी 1995 पासून सहा वेळा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान आज शनिवारी शर्मा यांच्या पार्थिवावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (akola news senior bjp mla govardhan sharma passed away devendra fadnavis nitin gadkari)

ADVERTISEMENT

गोवर्धन शर्मा सलग 6 वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. गोवर्धन शर्मा हे मनोज जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते आणि यवतमाळचे पालकमंत्रीही होते. तसेच लालाजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते देखील होते. भाजपचे नगरसेवक होण्यापासून ते आमदार आणि मंत्रीपदापर्यंत त्यांनी पद भूषवली होती.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ गोवर्धन शर्मा आजाराने त्रस्त होते आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले. आज अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यानी गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे फडवणवीस म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर! ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीत काय घडलं? Inside Story

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील गोवर्धन शर्मा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. दरम्यान गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने भाजपवर शोककळा पसरली आहे आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT