Ambernath: 'हा' VIDEO हादरवून टाकेल, बायका-मुलं बसलेल्या कारला मुद्दाम दिली धडक; एकाला चिरडलंच!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

ambernath accident video viral car rider hit park car in old rivalry accidnent video viral ambernath jambhul naka shocking story
अंबरनाथमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंबरनाथमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

point

एका कार चालकाने एका दुसऱ्या कारला भीषण धडक दिल्याची घटना

point

एकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी

Ambernath Accident Video Viral : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना प्रचंड वाढल्या असतानाच आता अंबरनाथमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका कार चालकाने एका दुसऱ्या कारला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत त्याने एकाला फरफटत देखील नेले आणि त्यानंतर पुन्हा कार रिवर्स घेऊन दुसऱ्याला कारला ठोकर दिली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 
(ambernath accident video viral car rider hit park car in old rivalry accidnent video viral ambernath jambhul naka shocking story) 

ADVERTISEMENT

अबंरनाथच्या जांभूळनाका परिसरात ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक काळ्या रंगाची एसयुव्ही भरधाव वेगाने येते. या दरम्यान कारचालक तिच्यासमोर असलेल्या लोकांच्या अंगावर गाडी घालतो. या घटनेत एक जण कारखाली फसतो आणि त्यालाच कारचालक दुरपर्यंत फटफटत नेतो. 

हे ही वाचा : Badlapur School case चा FIR आला समोर, घटना वाचून तुमच्याही डोक्यात जाईल सणक

एका व्यक्तीला कारखाली फटफटत नेल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी रिवर्स घेतो आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या सफेद रंगाच्या टाटा सफारी गाडीला समोरा समोर धडक देते. या सफारी गाडीतून आधीच एक कुटुंब प्रवास करत असते. त्यामुळे या कुटुंबाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

हे वाचलं का?

ही घटना अंबरनाथच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडली आहे. त्यामुळे नागरीक देकील आक्रमक होतात आणि आरोपी कारचालकाची गाडी फोडून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, असे या व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान या अपघाताच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंबरनाथच्या जांभूळ फाट्यावर ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.दोन्ही कुटुंब ही मुंबईचे रहिवासी आहेत. आणि कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद सूरू होता. या वादातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी काळ्या रंगाच्या एसयूव्हीवर दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Badlapur News : ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', CM शिंदेंच्या नेत्याची मुजोरी

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT