Badlapur School case चा FIR आला समोर, घटना वाचून तुमच्याही डोक्यात जाईल सणक
Badlapur adarsh school FIR news: बदलापूरमध्ये एका चार वर्षीय मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील FIR आता समोर आला आहे. ज्यामध्ये नेमकी काय घटना घडली हे समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा FIR आला समोर
Fir मध्ये नेमकी घटना काय हे उघडकीस
बदलापूरमधील नागरिकांचा झाला उद्रेक
Badlapur school case: बदलापूर: बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर येथील 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर येताच एकच उद्रेक झाला. आज (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 9 तास बदलापूरकरांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. (fir of badlapur school sexual assault of a four year old girl case an incident that shocked everyone came to light)
आरोपीला आजच्या आज फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या.. अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी ठिय्या दिला होता. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: तिथे येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आंदोलक एक इंचही मागे हटले नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीहल्ला करत आंदोलकांना पांगवलं.
हे ही वाचा>> Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!
यानंतरही अनेक आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलीस एफआयआर (FIR) ही समोर आली. ज्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे त्यात नमूद केलं आहे.









