Amruta Fadnavis : अमृता फडणवीस-देवेंद्र फडणवीसांचं प्रभू श्रीरामावर येतंय गाणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

amruta fadnavis devendra fadnavis new song on shree ram
amruta fadnavis devendra fadnavis new song on shree ram
social share
google news

Amruta Fadnavis new song : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशभरात भारावलेलं वातावरण आहे. शरयूच्या काठी रामभक्त गर्दी करू लागले आहे. सगळीकडे राम नामाचा जप केला जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. अमृता फडणवीस यांच्या आवाजातील आणि आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामावर शब्दबद्ध केलेलं गाणं रिलीज होणार आहे.

अमृता फडणवीस यांनी पुण्यात त्यांच्या नव्या गाण्याबद्दल घोषणा केली. रविवारी (२१ जानेवारी) पुण्यामध्ये नमो वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.

हेही वाचा >> “…तोपर्यंत जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे”, CM शिंदेंची विनंती

त्या म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या गाण्यातील काही कडवी मी गायली आहेत. हे गीत लवकरच रिलीज होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >> “…तर भाजपसोबत आम्ही तुम्हालाही गाडू”, आंबेडकर ‘मविआ’वर कडाडले

‘प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत आहे.देशभर आनंदोत्सव साजरा केला जातोय. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत. ही सर्व देशवासियांसाठी सुखाची बाब आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे हे साध्य झाले आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कैलाश खेर यांच्यासोबतही गायलं गाणं

अमृता फडणवीस यांचं आणखी एक भजन रिलीज झालं आहे. हे रामभजन अमृता फडणवीस यांनी गायक कैलाश खेर यांच्यासोबत गायलं आहे. याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या आणि अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्याची त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT