अनंत अंबानींनी रस्त्यावरच खरेदी केला कोंबड्यांचा ट्रक, पण सोशल मीडियावर मात्र...
Anant Ambani Viral Video: अनंत अंबानी यांनी रस्त्यावरच एक कोंबड्यांनी भरलेला संपूर्ण ट्रक खरेदी केला. पण यावरूनच सोशल मीडियावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT

जामनगर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी सध्या त्यांच्या जामनगर ते द्वारका या १४० किलोमीटरच्या पदयात्रेमुळे चर्चेत आहेत. या पदयात्रेदरम्यान त्यांनी एका अनपेक्षित कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनंत अंबानींनी कत्तलखान्यात नेण्यासाठी जाणाऱ्या २५० कोंबड्या दुप्पट किंमतीत विकत घेतल्या आणि त्यांना जीवनदान दिले. या घटनेमुळे सोशल मीडियावर त्यांच्या दयाळूपणाची आणि प्राणीप्रेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अनंत अंबानी यांनी 28 मार्च 2025 रोजी जामनगरच्या मोती खावडी येथून द्वारकाधीश मंदिराकडे जाण्यासाठी पदयात्रेला सुरुवात केली. ही यात्रा त्यांनी आपल्या 30 व्या वाढदिवसानिमित्त (10 एप्रिल) भगवान द्वारकाधीश यांचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी सुरू केली आहे.
हे ही वाचा>> अनंत अंबानींनी कोंबड्यांचा संपूर्ण ट्रकच का घेतला विकत... काय आहे कारण?
या पदयात्रेच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच 1 एप्रिल रोजी, त्यांना वाटेत एक ट्रक दिसला, ज्यामध्ये 250 कोंबड्या पिंजऱ्यात बंदिस्त अवस्थेत कत्तलखान्यात नेण्यासाठी जात होत्या. अनंत अंबानींनी तात्काळ हा ट्रक थांबवला आणि ट्रक चालकाशी बोलून या कोंबड्या विकत घेतल्या. त्यांनी या कोंबड्यांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवले आणि "आता या आम्ही पाळू," असे सांगत एक कोंबडी हातात घेऊन "जय द्वारकाधीश" अशी घोषणा दिली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.










