Andheri Landslide : मुंबईत बहुमजली इमारतीवर कोसळली दरड
अंधेरी पूर्वमध्ये येणाऱ्या चकाला परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आली. रामबाग सोसायटीवर दरड कोसळली असून, काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
ADVERTISEMENT
Andheri Landslide News : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना गेल्या आठवड्यात (19 जुलै) घडली. अशीच घटना आता अंधेरीत घडली आहे. अंधेरी पूर्वमध्ये चार ते पाच फ्लॅटवर भलीमोठी दरड कोसळली. रहिवाशांनी वेळीच जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व भागात चकाला परिसरात रामबाग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सहा-सात फ्लॅट आहेत. त्या सगळ्यांवरच दरड कोसळली असून, मोठंमोठे दगड येऊन आदळल्याने काही घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
वाचा >> Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रचंड मोठी घोषणा, अजितदादांना मोठा धक्का?
हे वाचलं का?
दरड दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या इथे मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे.
अंधेरीत दरड कशी कोसळली?
नरेंद्र नावाच्या रहिवाशाने घटनेबद्दल अधिक माहिती दिली. “रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खूप जोरात… खूप मोठा आवाज आला. आम्ही सात लोक घरात झोपलेलो होतो. मोठा आवाज ऐकून आम्ही घाबरलो. अचानक काय झालं? असा प्रश्न आम्हाला पडला. कारण कधीच असा अनुभव आलेला नाही”, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
“आमच्या लाईनमध्ये सहा घरं आहेत. त्या सहाही घरांचं नुकसान झालं. चार घरांचं जास्त नुकसान झालं आहे. 2007 मध्येही अशी घटना घडली होती. आम्ही बिल्डरला हे सांगितलं, भांडलो. त्याने मागच्या बाजूने काँक्रिटिकरण केलं, पण ते व्यवस्थित केलेलं नाही. औपचारिकता म्हणून त्याने ते केलेलं आहे”, असा दावा त्यांनी केला.
ADVERTISEMENT
वाचा >> पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या
पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार महाकाली रोडवर गुरु नानक शाळेजवळ ही सोसायटी आहे. सात मजली इमारत असून, रात्री अचानक टेकडीवरून माती आणि दगड यांचं भूस्खलन झालं. या सोसायटीत 168 खोल्या असून, संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT