Viral Video: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! गणपतीपुळेतील ‘ही’ लाट ‘बिपरजॉय’मुळे?
Biparjoy Cyclone effect: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर एका अजस्त्र लाटेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जाणून घ्या या लाटेमुळे नेमकं किनाऱ्यावर काय घडलं.
ADVERTISEMENT
biparjoy cyclone konkan ratnagiri ganpatipule sea wave high tide Terrible incident rain monsoon
Biparjoy Cyclone: गोकूळ कांबळे, रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे (Ganpatipule) येथील समुद्रकिनारी काल (11 जून) एक भयंकर घटना घडली. संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एक महाभंयकर लाट (Wave) किनाऱ्यावर धडकली. ज्यामध्ये किनाऱ्यावरील सर्व दुकानांची वाताहात झाली. सगळ्यात भयंकर बाब म्हणजे जेव्हा ही अजस्त्र लाट आली तेव्हा किनाऱ्यावर हजारो लोक समुद्र स्नानाचा आनंद घेत होते. जे एका क्षणात बाहेर फेकले गेले. सुदैवाने या लाटेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (biparjoy cyclone konkan ratnagiri ganpatipule sea wave high tide Terrible incident rain monsoon)
नेमकं काय घडलं गणपतीपुळ्यात?
गणपतीपुळे येथील समुद्र किनारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वेगाने एक लाट आली. त्यापाठोपाठ दुसरी अजस्त्र लाट वेगाने किनार्यावर धडकली. सुरवातीला आनंद वाटणार्या पर्यटकांच्या मनात मात्र यानंतर खूपच धडकी भरली.
किनार्यावरील कट्ट्यावर आनंद घेणार्या पर्यटकांचीही यावेळी तारांबळ उडाली. यावेळी वाळूमधून धावताना काही पर्यटकांच्या पायाला दुखापत झाली तर लाटेच्या वेगाने धक्क्यावर आपटलेल्या पर्यटकांनाही दुखापत झाली. त्यातील चार जणांना उपचारासाठी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी अजस्त्र लाट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. #BiparjoyCyclone pic.twitter.com/vsfBVtmCpg
— Rohit Gole (@RohitGole2) June 12, 2023
लाट जशी वेगात आली, तशीच ती परतलीही. लाट परतत असतानाच एक मुलगा पाण्याबरोबर आत ओढला जात होता. मात्र, किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षक आणि पर्यटकांनी त्याला वेळीच पकडलं. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सुदैवाने या मोठ्या लाटेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये किनार्यावरील जीवरक्षकांनी पर्यटकांची वेळीच सुरक्षा पुरवली. दरम्यान, यावेळी किनार्यावर असलेल्या दहाहून अधिक स्टॉलधारकांचे प्रचंड नुकसान झालं. अजस्त्र लाटेतमध्ये त्यांच्या दुकानातील बरंचसं साहित्य वाहून गेलं.
हे ही वाचा >> Mira Road Murder: ‘मी HIV पॉझिटिव्ह, सरस्वतीसोबत…’ मनोज सानेचा दावा
हा प्रकार झाल्यानंतर पोलीस प्रशासन, जीवरक्षकांनी समुद्रात कुणालाही सोडायचे नाही असा निर्णय घेतला होता. परंतू अनेक पर्यटक याकडे कानाडोळा करून समुद्राकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे पुन्हा एकदा बिपरजॉय वादळाची तीव्रता वाढताना पाहायला मिळत आहे. अशावेळी किनार्यावर जाणार्या पर्यटकांनाही बाहेर येण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. दरम्यान, कालच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम?
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) हे सध्या संपूर्ण ताकदीने पुढे सरकत आहे. अशावेळी त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता उंचच उंच लाटाही समुद्रात उसळत आहेत. तर काही ठिकाणी पावसाच्या सरीही बरसत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT