‘कल्याण लोकसभा भाजपच्या चिन्हावर’, रोहित पवारांनंतर मनसे आमदारांचं मोठं भाकित

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Raju patil statement on kalyan lok sabha candidate
Raju patil statement on kalyan lok sabha candidate
social share
google news

Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून सध्या भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला गेला होता. आता ही चर्चा पुन्हा सुरु झाली रोहित पवारांच्या विधानामुळे. यातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाऊ शकतो, असं म्हटलं आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत. पण, ही जागा भाजप स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असे विधान केले होते.

रोहित पवारांच्या विधानावर राजू पाटील काय बोलले?

रोहित पवारांच्या भूमिकेचं मनसे आमदार राजू पाटील यांनी समर्थन केलं आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, “रोहित पवार यांचा तर्क असू शकतो. रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांना ही टीप मिळाली असेल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Raj Thackeray Speech Video : राज ठाकरेंची ठाण्यात फटकेबाजी, उपस्थित हसून लोटपोट

त्यांनी पुढे सांगितलं की, “माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे की, कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे. भाजपचे मोठे नेते अनुराग ठाकूर या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात. त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे असे सांगितले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा मतदारसंघ मनसे लढवेल आणि स्वबळावर लढवेल”, असे राजू पाटील म्हणाले.

निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका -आमदार राजू पाटील

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले. “प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले. वन विंडो स्कीम सुरू आहे. या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही. त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले तसे येत्या निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल”, असे आवाहन राजू पाटील यांनी नागरिकांना केले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘आता गप्प का?’, शरद पवारांमुळे राहुल गांधी खिंडीत, नेमकं काय घडलं?

या दरम्यान वाढदिवस माझ्या वाढदिवसाच्या बॅनर लावू नका. एका बॅनर ऐवजी निदान एक खड्डा भरा, असा आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केलं. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT