Breast Cancer : महिलेच्या छातीवर लावला सिमेंट अन् चुना, अघोरी उपचाराने गेला जीव

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

breast cancer treatment with cement fraud doctor looted cancer patient died viral story
breast cancer treatment with cement fraud doctor looted cancer patient died viral story
social share
google news

Breast cancer treatment with Cement : शहाण्या माणसाने कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये, असे नेहमी बोलले जाते. आणि ते तितकेच खरे देखील आहे.या घटनेतून ते अधोरेखीत देखील होते आहे. कारण या घटनेत एका महिलेसोबत (Women) उपचाराच्या नावावर मोठी फसवणूक झाली आहे. या फसवणूकीत महिलेचे पैसै तर गेलेच त्याबरोबर रूग्णाचा जीव देखील गेला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर घटनेचा तपास सूरू झाला आहे. (breast cancer treatment with cement fraud doctor looted cancer patient died viral story)

चीनमध्ये (chin) ही घटना घडली आहे. वांग आडनावाच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2021 साली माझ्या आईला लास्ट स्टेजचा कॅन्सर (Breast Cancer) झाला होता. यानंतर महिलेची भेट चीनमधील कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरशी झाली होती. वांग आणि तिची आई डोंगयुसानबाओ ट्युमर रिसर्च इस्टीट्युटमध्ये यू नावाच्या व्यक्तीला भेटायला गेली. या व्यक्तीने त्याच्याकडे असलेले औषध कॅन्सरचे सेल्स मारू शकेल असा दावा केला होता. या दाव्यासोबत त्याने महिलेला पेटंट डॉक्युमेंट आणि अॅवॉर्ड सर्टीफिकेटही दाखवले होते. ज्यामुळे वांगचा डॉक्टरवर विश्वास बसवला होता.

उपचारात 23 लाख खर्च

डॉक्टरचा दावा आणि आईची तब्येत पाहून वांगने लगेच 20 हजार युआनवर(2.23 लाख रूपये) यू कडून औषधाचा पहिला साठा खरेदी केला. हे औषध एक वर्ष खायचं होतं. यासाठी उपचारासाठी तिने घरापासून वुहानला प्रवास केला. ज्यामध्ये तिचे उपचाराखातर साधारण 2 लाखाहून अधिक युआन (साधारण 23 लाख) खर्च केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण

डॉक्टराने खाण्यासाठी दिलेल्या औषधासोबत तिच्या छातीत डझनभर इजेक्शन दिले होते. त्याचसोबत डॉक्टराने चुन्यासोबत सिमेंट मिसळून तिच्या काखेत लावायला सांगितले होते. या उपचारातून हृदयात झालेल्या गाठी कमी होतील असा दावा डॉक्टरने केला होता. उपचाराच्या नावाखाली माझ्या आईने हे सगळं केलं. साधारण दोन महिने असे केल्यावर तिची त्वचा जळाली आणि त्यावर फोड आले. तरी देखील मुलीला डॉक्टरवर संशय आला नाही.

या सर्व घडामोडीनंतर एप्रिल महिन्यात तिच्या आईची तब्येत आणखीणच खालावली. कॅन्सर सेल्स तिच्या संपूर्ण शरीरभर पसरले होते. पण डॉक्टरांनी ही नॉर्मल सांगत, मी दिलेले औषध घेत जा असे सांगितले आणि जूनमध्ये आईचे निधन झाले.

ADVERTISEMENT

दरम्यान आईच्या निधनानंतर वांगला तिला तिची फसवणूक झाल्याचे कळून आले. आणि तिने इस्टीट्यूड विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर डॉक्टरचा भांडाफोड झाला. या इस्टीट्यूडकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नाही किंवा तो प्रॅक्टिशनर नाही. तो म्हणाला की मी त्यांना फक्त आरोग्यदायी उत्पादने विकली. बनावट प्रमाणपत्रे व पुरस्कार ऑनलाइन खरेदी केल्याचेही त्याने कबूल केले. या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सूरू केला आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती रूग्णाची फसवणूक झाली आहे, याचा तपास केला जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : घृणास्पद! दलित तरुणांना आधी केलं नग्न, नंतर लघवी…, घडली भयंकर घटना

    follow whatsapp

    ADVERTISEMENT