Buldhana: ”टायर फुटलाच नाही…” RTO चा खळबळजनक रिपोर्ट, समृद्धीवर घडलं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

buldhana bus accident samrudhhi highway amaravati and nagpur rto accident reports
buldhana bus accident samrudhhi highway amaravati and nagpur rto accident reports
social share
google news

नागपूरहून पुण्याचे दिशेने जाणाऱ्या एका बसला बुलढाण्यातील समृद्धी महामार्गाव भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या भीषण अपघाताची आता कारणे शोधली जात आहेत. प्राथमिक माहितीनूसार हा अपघात बसचा टायर फुटल्याने झाल्याची माहिती समोर येत आहेत. याचसोबत बस चालकाला झपकी लागल्याने हा अपघात झाल्याचेही बोलले जात आहे. अपघाताची अशी अनेक कारणे समोर येत असताना आता बस दुर्घटनेसंबंधी परिवहन विभागाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात अपघाताचे नेमके कारण सांगण्यात आले आहे. आता हे कारण काय आहे हे जाणून घेऊयात. (buldhana bus accident samrudhhi highway amaravati and nagpur transport department accident reports)

बुलढाणा बस दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन परीस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी समृद्दी महामार्गावर जितकेही अपघात झाले आहेत, हे अपघात ड्रायव्हरच्या चुकांमुळे झपकी लागून झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर या दुर्घटनेतून बचावलेल्या एका ड्रायव्हरने हे अपघात टायर फुटून झाल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे नेमका हा अपघात कसा झाला आहे? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.

हे ही वाचा : Buldhana Accident: लाडक्या लेकाला नागपूरला सोडलं अन्.., नवरा-बायको अन् मुलीचा दुर्दैवी मृत्यू

परिवहन विभागाच्या अहवालात काय?

बुलढाणा बस दुर्घटनेची अनेक कारणे समोर येत असताना आता अमरावती आणि नागपूर परिवहन विभागाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात ड्रायव्हरच्या चुकांमुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवला गेला आहे. अमरावती परिवहन विभागाच्या अहवालात, बुलढाणा बस दुर्घटना ही टायरफुटीने झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर हा अपघात ड्रायव्हरला झपकी लागल्याने नियंत्रण सुटून झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमरावतीसोबत नागपूर परिवहन विभागाचाही अहवाल समोर आला आहे. या अहवालात देखील चालकाला झपकी लागल्यामुळे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अमरावती आणि नागपूर परिवहन विभागाच्या अहवालात बुलढाणा बस दुर्घटनाही ड्रायव्हरच्या चुकीमुळे घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता काय कारवाई करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Buldhana: 26 प्रवाशांचा मृत्यू, ‘त्या’ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT