रस्ता नसल्यानं बायकोचा जीव गेला, ग्रामस्थांसह नवऱ्यानं काय केलं बघाच!

मुंबई तक

chandrapur ground report : चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील घोडानाकप्पी गावात रस्त्याअभावी गर्भवती संगीता गेडाम यांचा मृत्यू झाला. पत्नीला गमावल्यानंतर पती तुळशीराम गेडाम यांनी आदिवासी बांधवांसह श्रमदानातून स्वतःच रस्ता तयार करण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

chandrapur ground report
chandrapur ground report
Google CTA

बातम्या हायलाइट

point

रस्ता नसल्यानं बायकोचा जीव गेला

point

ग्रामस्थांसह नवऱ्यानं काय केलं बघाच!

chandrapur ground report : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडानाकप्पी गावातील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. टेकड्यांनी वेढलेल्या या गावात सुमारे 20 घरांची वस्ती असून, गेल्या तीन दशकांपासून येथे आदिवासी समाज वास्तव्यास आहे. गावात अंतर्गत काँक्रीटचा रस्ता, अंगणवाडी आणि गावाबाहेर जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. मात्र गावापर्यंत पोहोचण्यासाठी आजही खडकाळ पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. या मार्गावर दुचाकी वाहन पोहोचत नाही, तर रुग्णवाहिका पोहोचणेही शक्य होत नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती तसेच गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर डांबरी रस्ता संपतो आणि त्यानंतर गावापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नसल्याचे या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आले आहे.

हेही वाचा : Personal Finance: लग्नानंतर Joint Account की Separate Account.. नेमकं काय चांगलं?

दोन महिन्यांपूर्वी गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी मृत्यू

याच रस्त्याअभावी दोन महिन्यांपूर्वी गर्भवती संगीता गेडाम या 25 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. प्रसूतीची वेळ आल्यानंतर तिला वेळेवर उपचारासाठी घेऊन जाण्यात अडचणी आल्या. रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे तिला अवघड मार्गातून दुसऱ्या वाहनाने नेण्याची वेळ आली. या घटनेनंतर मागे तीन वर्षांचा मुलगा, नवजात मुलगी आणि कुटुंबाची जबाबदारी राहिली. संगीताचे पती तुळशीराम गेडाम यांनी रस्त्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. ग्रामस्थांनीही अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना रस्त्याची मागणी केली होती. 2021 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गावापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता बांधण्यात आला. मात्र गाव टेकडीच्या पायथ्याशी असल्याने उरलेल्या दीड किलोमीटर अंतरासाठी पुन्हा खडकाळ पायवाटच राहिली. पावसाळ्यात ही वाट आणखी धोकादायक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, मान्सून गायब होण्याची शक्यता?