Shivaji Maharaj Statue : मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला 'इथून' केली अटक, नेमका कसा सापडला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhatrapati shivaji maharaj statue collapsed accuse jaydeep apte arrested
शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक

point

कुटुंबियाला भेटायला आला असताना झाली अटक

point

पुतळा दुर्घटनेतील होता मुख्य आरोपी

Jaydeep Apte Arrested : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या प्रकणातील मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता.अखेर आज त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याणमध्ये आपल्या कुटुंबियाला भेटायला आला असताना कल्याण पोलिसांनी त्याला अटक केली. (chhatrapati shivaji maharaj statue collapsed accuse jaydeep apte arrestd)  

ADVERTISEMENT

शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. पण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतले आहे. जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट जारी केली होती. आपटे पुतळा कोसळल्यापासून फरार होता. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

दरम्यान आता जयदीप आपटेच्या अटकेवरून आता राजकारण सूरू झाले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जयदीप आपटेला त्याच्या घरातून अटक केली. याचा अर्थ तो स्वतः समोर आला, पोलिसांना सापडला नाही. हा निष्कर्ष निघू शकतो. असो!त्याला असलेल्या वरदहस्तामुळे तो सापडायला इतका वेळ लागला का? हा प्रश्न आहेच, असा सवाल केला आहे. 

हे वाचलं का?

प्रकरण काय? 

गेल्या वर्षी  4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधील राजकोट किल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण केले होते. या अनावरणाला आता नऊ महिने उलटले आहेत. पण अवघ्या 9 महिन्यात शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामकाजाच्या निकृष्टतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावरून आता स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वी मोदींच्या दौऱ्यावेळी हा पुतळा घाईगडबडीत बसवला होता. त्यावेळी स्थानिकांनी या पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र ते विरोधक आहेत म्हणून त्यांच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आणि आज पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडला. त्यामुळे सरकारच्या कामाचे आज वाभाडे निघाले आहेत, असे उबीटीचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. या प्रकरणी एफआयर दाखल झाली पाहिजे, जर प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने एफआयआर दाखल केला नाहीतर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT