शिवाजी महाराज वाघनखे : संजय राऊतांचा चढला पारा, शिंदे सरकारला म्हणाले…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shivaji Maharaj Wagh nakh controversy : Sanjay Raut hits out at Shinde government.
Shivaji Maharaj Wagh nakh controversy : Sanjay Raut hits out at Shinde government.
social share
google news

Sanjay Raut on Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. पण, या वाघनखांवरून वेगळाच वाद सुरू झाला आहे. या वादापासून स्वतःला दूर ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टोले लगावले आहेत. शिंदे गटाला गुलाम असं संबोधत राऊतांनी काही सवाल केले आहेत.

ADVERTISEMENT

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले,”छत्रपतींची वाघनखं आणायला गेलेत, आनंद आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखे म्हणजे शिवसेना आहे, हे लक्षात ठेवा. गेली 50-55 वर्षे या वाघनखांनी महाराष्ट्रावर येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा कोथळा काढला आहे. आणि तुम्ही ती वाघनखं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या वाघनखांवर वाद सुरू आहे. आम्हाला वाद घालायचा नाही.”

हेही वाचा >> Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?

“वाघनखे आणून काय करणार आहात?”

“काल आदित्य ठाकरेंनी त्यावर भाष्य केले आहे. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारच्या कल्पना डोक्यात येतात. छत्रपती शिवजाी महाराज… त्यांचा इतिहास हे सगळं मराठी माणसाला नव्हे, तर जगाला प्रेरणादायी आहे. पण, वाघनखं आणून काय करणार आहात? दिल्लीची गुलामीच करणार आहात ना? एक प्रकारे ही वाघनखं आणून तुम्ही या वाघनखांचा अपमान करत आहात. कारण आपण (शिंदे सरकार) महाराष्ट्राला दिल्लीचं गुलाम केलं आहे”, अशी टीकेची तोफ संजय राऊतांनी शिंदे सरकारवर डागली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> One Nation-One Election: 2024 मध्ये ‘एक देश-एक निवडणूक’ होणार? मोठी बातमी आली समोर…

“छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं यासाठी वापरली की, त्यांना महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त करायचं होतं. त्यांनी वाघनखं वापरून दिल्लीचा कोथळा काढला आणि हे (शिंदे गट) गुलाम, ज्यांनी महाराष्ट्राला दिल्लीचं पायपुसणं केलं आहे; ते गुलाम महाराष्ट्रामध्ये वाघनखं आणून शिवरायांचा अपमान करताहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT