Naxalites Attack : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद, 14 जखमी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chhattisgarh naxalite attack of crpf camp in bijapur shocking story
chhattisgarh naxalite attack of crpf camp in bijapur shocking story
social share
google news

Chhattisgarh Naxalite Attack : छत्तीसगडमधील सुकमा-बिजापूर जिल्ह्यातील सीआरपीएफ कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची घटना घडली आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले, तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याता आले आहे. या हल्ल्यानंतर फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. (chhattisgarh naxalite attack of crpf camp in bijapur shocking story)

मिळालेल्या माहितीनुसार, आज 30 जानेवारी रोजी सुकमा पोलीस स्टेशन जगरगुंडा परिसरात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षा शिबिर लावण्यात आले होते. शिबिरानंतर सीआरपीएफचे कोब्रा सैनिक जोनागुडा-अलिगुडा परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलालवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून गेले.

हे ही वाचा : Nitish Kumar : राहुल गांधींचा नितीश कुमारांवर निशाणा, ‘थोडासा दबाव पडताच…’

दरम्यान नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या या चकमकीत 3 जवान शहीद झाले आहेत, तर 14 जवान जखमी झाले. या जखमी जवानांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे. तसेच या जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.या हल्ल्यानंतर घटनास्थळी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, त्याचसोबत परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : आधी मुख्यमंत्र्याचा फोन टाळला, आता वडेट्टिवारांच्या भेटीला, किरण सामंतांचं नेमकं चाललंय काय?

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT