Ganpat Gaikwad : ‘रॉकेल ओतून जाळून घेईल..’, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील BJP आमदार संतापला!
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्द्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. तसंच आत्मदहनाचा इशाराही दिला.
ADVERTISEMENT
कल्याण: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे (Thane) जिल्हातील एका भाजपच्या आमदाराचा (BJP MLA) अंबरनाथ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यावरून प्रचंड वाद झाला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. शिवाय जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर मी स्वतःच अंगावर रॉकेल ओतून जाळून घेईल अशी धमकीच त्यांनी यावेळी दिली. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना अधिकारीही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. (cm eknath shinde thane district bjp mla ganpat gaikwad farmer midc officer disput self immolation)
ADVERTISEMENT
अंबरनाथ-बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एकेरी मार्ग गेल्या दोन महिन्याभरापासून बंद आहे. तर दुसरा एकेरी मार्ग अरुंद असल्याने या रस्त्यावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी एमआयडीसी आणि बाधित शेतकऱ्यामध्ये रस्त्याच्या भूसंपादनाच्या वादातून होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या 50 वर्षांपासून जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यावरून तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी एकेरी मार्ग बंद केला आहे. मात्र, रस्ता बंद करूनही एमआयडीसी प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमिन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, बुधवारी बंद केलेला एकेरी मार्ग खुला करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास घटनास्थळी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड पोहचले. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप करत सदरचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचा इशारा दिला.
हे वाचलं का?
अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे 50 वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादीत केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एका कागदी चुकीमुळे रस्ता आणि पाईपलाईन ज्या जागेतून टाकण्यात आली आहे, त्याऐवजी बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा पेचात इथले शेतकरी अडकले.
हे ही वाचा >> अरेच्चा हा काय घोळ! जिगलच्या ‘आधार’ कार्डवर दिसताहेत देवेंद्र फडणवीस
ही कागदी चूक सुधारण्यासाठी मागील 50 वर्षांपासून लढा देऊनही एमआयडीसी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हेत. त्यातच 21 जून रोजी बुधवारी सकाळी अचानक एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी येत हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विरोध केला. त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ADVERTISEMENT
याबाबतची माहिती मिळताच स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही या ठिकाणी धाव घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केवळ एक कागदी चूक सुधारण्यासाठी मागील 50 वर्षात वेळ मिळालेला नसून त्यांना फक्त पैसे हवे आहेत, असा आरोप केला. तसंच एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांना कोर्टात जाण्यासाठी सांगत आहेत, मात्र निजामाच्या जागेची केस मागील 100 वर्षांपासून सुरू आहे, तशीच ही जागा सुद्धा कोर्ट-कचेऱ्यांमध्ये अडकवून ठेवायची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर येत्या अधिवेशनातही आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचं गणपत गायकवाड यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नेमकं प्रकरण?
डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील बारवी धरण पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांचे भूसंपादन केले होते. वसार गावातील शेतकऱ्यांची जमीन देखील यामध्ये भूसंपादित झाली होती. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची आगाऊ रक्कम देखील शासनाकडून देण्यात आली होती. मात्र एमआयडीसीने भूसंपादनासाठी मंजूर केलेली जमिन संपादीत न करता दुसरी जमीन संपादीत केली असल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी नरेश वायले यांनी केली आहे. एमआयडीसीने भूसंपादित केलेली जमिन व शेतकऱ्यांची खासगी जमीन दोन्ही भूखंडावर एमआयडीसी आपला हक्क सांगत असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांची खासगी जमिनीचा काहीही वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. खासगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी निधी मागत असल्याचा आरोप वायले यांनी केला होता.
भूसंपादन झालेली जमीन एमआयडीसीला देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र खासगी जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत. याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने देखील एमआयडीसीला पत्रव्यवहार केला असून एमआयडीसी पाईप लाईन व रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे.
हे ही वाचा >> अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच ‘कार्यक्रम’, शरद पवारांच्या खेळीचा अर्थ काय?
तशी मोजणी नकाशाची प्रत देखील एमआयडीसी कार्यालयास भूमी अभिलेखाकडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतऱ्यांच्या देखील खासगी जमिनीवर एमआयडीसीने अतिक्रमण केले आहे. एमआयडीसी अधिकारी याकडे गांर्भियाने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करतात. गेले अनेक वर्षे शेतकरी यासाठी लढा देत असतानाच शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे.
पावसाळ्यात या महामार्गाची दूरवस्था झाल्याने पावसाळ्यानंतर एमआयडीसीने या रस्त्याची डागडुजी काम हाती घेतले होते. वसार गावाच्या हद्दीत मात्र रस्त्याची डाग़डुजी करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याने या भागातील रस्त्याची दूरवस्था कायम आहे. आधी आमच्या जमिनीचा प्रश्न सोडवा नंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT