महागाईचा आगडोंब उसळणार!, सणासुदीच्या काळातच गॅस सिलिंडरच्या किंमती भडकणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

commercial lpg gas cylinder price hike oil marketing companies big financial hit for traders, increase Delhi, Mumbai and Chennai
commercial lpg gas cylinder price hike oil marketing companies big financial hit for traders, increase Delhi, Mumbai and Chennai
social share
google news

LPG Price Hike: महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असतानाच आता सामान्य नागरिकांना आणखी महागाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण आजपासूनच ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे, त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून (Oil Marketing Company) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Gas Cylinders Price Hike) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यावेळी तेल कंपन्यांकडून गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली असून 19 किलोचा गॅस सिलिंडर 209 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता सामान्य व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

ADVERTISEMENT

सणासुदीच्या काळात फटका

ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्री आणि दसरा यासारखे सण देशभरात साजरे केले जातात. मात्र त्याआधीच तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. एलपीजीच्या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 1 ऑक्टोबरपासून 1731.50 रुपये होणार आहे. तर याआधी 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 157 रुपयांनी कपात करण्यात आली होती, मात्र आता त्यापेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> ₹2000 नोटेबद्दल मोठी अपडेट! RBI ने ‘त्या’ नागरिकांना दिला दिलासा

अशी होणार किंमतीत वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सप्टेंबर महिन्यात कपात करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत त्याची किंमत 1,522 रुपये झाली होती. तर कोलकातामध्ये 1636 रुपयांना मिळणार गॅस आता 1839.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर मुंबईत 1482 रुपयांनी असलेला गॅस सिलिंडर 1684 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये 1898 रुपयांना मिळणार आहे.

हे वाचलं का?

मिळाला होता दिलासा

ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून केंद्र सरकारने 30 ऑगस्ट पासून 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेऊन जनसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. तर त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवरुन 903 रुपये झाली आहे. तर देशातील अनेक शहरात सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी झाले. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीच्या गॅस सबसिडीमध्ये 400 रुपये करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 703 रुपयांपर्यंत घसरली आहे.

हे ही वाचा >> Aditya Thackeray : जपान दौऱ्यांवरून फडणवीसांना लक्ष्य, ‘आदू बाळा’… म्हणत शेलारांची बोचरी टीका

खाद्यपदार्थांच्या किंमतीवर परिणाम

ऑगस्टच्या सुरुवातीला ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 99.75 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमती 257 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तर आता त्याच्या किंमतींत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या झालेल्या वाढीमुळे हॉटेल आणि घराबाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थाच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT