Indurikar: ‘सम-विषम तारखेला लैंगिक संबध..’, हायकोर्टाचा इंदुरीकरांना मोठा दणका
किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत जे वादग्रस्त विधान केलं होतं. त्याप्रकरणी आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण हायकोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT

Indurikar Maharaj: इशरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. आता या प्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण उच्च न्यायालयाने (High Court) इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. (controversial statement indurikar maharaj gender discrimination married couple sexual relations high court has ordered to file a case)
सम-विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा-मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसंच सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द केला होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर हायकोर्टात सुनावणी झाली. आता हायकोर्टाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा असं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Gautami patil: अहो इंदुरीकर, तुमचा ब्लॅकचा पैसा…; तृप्ती देसाईंनी भडकल्या
इंदुरीकर महाराजांना जिल्हा सत्र न्यायालायने दिलासा देताना त्यांच्यावरील गुन्हा रद्द ठरवला होता. पण या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन आणि राज्य सरकारकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनात लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी तक्रार दाखल केली होती.
इंदुरीकरांचं वादग्रस्त वक्तव्य
इंदुरीकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की, सम क्रमांकाच्या तारखांना (2, 4, 6, 8…) संभोग केल्याने मुलगा होतो. तर विषम क्रमांकाच्या तारखेला (1, 3, 5,7,9…) लैंगिक संबंध ठेवल्यास त्या दाम्पत्याला मुलगी होते.










