बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका टळलेला नाही, पाहा Live Tracker मधून क्षणाक्षणांचे अपडेट
Cyclone Biparjoy Live Tracker: हवामान विभागाच्या मते, बिपरजॉय हे हळूहळू गुजरातच्या किनाऱ्यावर पोहचले असून तिथे आता या वादळाचा नेमका परिणाम पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: अरबी समुद्रात (Arebian Sea) निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) वेगाने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. अरबी समुद्राला लागून असलेल्या सर्व राज्यांमध्ये (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ) त्याचा प्रभाव दिसून येत आहे. प्रथम केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईसह (Mumbai) अनेक शहरांमध्ये पाऊस आणि वेगवान वादळी वारे वाहू लागले आहेत. गुजरातच्या (Gujarat) सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहत आहेत. जामनगर आणि मुंबईत उधाणाची भरती पाहायला मिळत आहे. तसेच समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. हे लक्षात घेऊन या राज्यांच्या किनारी भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या काही भागातही पावसाच्या सरी बरसण्याच्या शक्यता आहेत. (cyclone biparjoy gujarat coast mumbai live tracker department of meteorology)
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या किती जवळ आहे?
चक्रीवादळ बिपरजॉय जसजसं पुढे जात आहे तसतसं वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची, वीज व फोन लाइनचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या गोष्टी लक्षात घेऊन आता प्रशासन कामाला लागलं आहे. त्याचबरोबर सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले जात आहे.
Live Tracker मधून वादळाचे क्षणाक्षणांचे अपडेट पाहण्यासाठी पुढील लिंकवर करा क्लिक>> https://shorturl.at/hjHM4
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हवामान विभागाच्या मते, बिपरजॉय 13 जून 2023 रोजी पहाटे 2:30 वाजता पोरबंदरच्या 290 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि जखाऊ बंदराच्या 360 किमी दक्षिण-नैऋत्येस ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर मध्यभागी होते. जो आता पुढे गेला आहे. IMD नुसार, बिपरजॉय 15 जून रोजी सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीच्या भागातून जाऊ शकते.
हे ही वाचा >> भाजपचं दबावतंत्र! एकनाथ शिंदेंनी घेतली तातडीची बैठक, काय ठरली रणनीती?
VSCS Biparjoy lay centered at 0230 IST of the 13th June, 2023 over Northeast and adjoining Eastcentral Arabian Sea about 290 km southwest of Porbandar & 360 km south-southwest of Jakhau Port. To cross Saurashtra & Kutch near Jakhau Port by evening of 15th June as a VSCS. pic.twitter.com/aTM24KvUsT
— India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2023
ADVERTISEMENT
या भागात आज पावसाची शक्यता
हवामान एजन्सी, स्कायमेटच्या मते, महुवा, पोरबंदर, ओखा, दीव, सोमनाथ, जामनगर, द्वारका इत्यादी किनारपट्टी भागात आणि भुज, मांडवी, नलिया इत्यादी भागात जोरदार पाऊस आणि सरी पडू शकतात. गुजरात आणि राजस्थानमध्ये जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सामान्यतः काही धुळीची वादळे दिसतात. पण आता इथे अवकाळी पावसाच्या सरी बरसू शकतात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
प्रशासनाचा इशारा
15 जूनच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छला ओलांडू शकते, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. वादळ किनारी भागात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार किनारी भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तैनात करत आहे. त्याच वेळी, संभाव्य बाधित राज्यांमधील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. यासोबतच समुद्राजवळ न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
ADVERTISEMENT