Cyclone Biparjoy In Gujarat : प्रचंड हाहाकार! चक्रीवादळ धडकल्यानंतर काय घडलं?
गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ बंदरावर धडकले. रात्री 12 वाजता कच्छमध्ये चक्रीवादळ पूर्णपणे जमिनीवर आले. या वेळी ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
ADVERTISEMENT

Cyclone Biporjoy Landfall : अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) संध्याकाळी गुजरातमधील जाखाऊ बंदरावर धडकले. यानंतर राज्यात 115-125 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने प्रचंड विध्वस घडवला. वादळ धडकल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शेकडो झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब तुटल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. समुद्राला लागून असलेल्या सखल भागात पाणी तुंबल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गुजरातमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ : गुजरातमध्ये आतापर्यंत काय घडले?
– गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता बिपरजॉय जखाऊ बंदरावर धडकले. रात्री 12 वाजता कच्छमध्ये चक्रीवादळ पूर्णपणे जमिनीवर आले. या वेळी ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
– वादळाच्या तडाख्यानंतर मांडवीमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले. जखाऊ मांडवी रोडवरही अनेक झाडे उन्मळून पडली.
– पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
#WATCH गुजरात: टीम 6 एनडीआरएफ ने रूपेन बंदर के निचले इलाके से 72 नागरिकों(पुरुष-32, महिला-25, बच्चे-15) को निकालकर एनडीएच स्कूल, द्वारका में स्थानांतरित किया।
(वीडियो सोर्स: NDRF)
#CycloneBiporjoy pic.twitter.com/MOhJUMZtkM
— ANI_HindiNews (@AHindinews) June 15, 2023
– पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत.
– बिपरजॉय चक्रीवादळानंतर गुजरातमधील भावनगरमध्ये गुरे वाचवताना पिता-पुत्राचा मृत्यू झाला. अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरे पाण्यात अडकली होती. त्यांना वाचवताना दोघांचा बुडून मृत्यू झाला.