Delhi News : 6 जणांचा गाढ झोपेतच मृत्यू! नेमकं घडलं तरी काय?

रोहिणी ठोंबरे

Delhi News : राजधानी दिल्लीत (Delhi) एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसर्‍या ठिकाणीही, दोन जणांचा मृत्यू याच कारणामुळे झाला आहे. खरं तर, हे मृत लोक स्वतःचा थंडीपासून बचाव करण्यासाठी, शेकोटी पेटवून खोलीत झोपले होते. यावेळी खोलीत धुराचे लोट पसरले. यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेतही […]

ADVERTISEMENT

Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation
Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation
google news

Delhi News : राजधानी दिल्लीत (Delhi) एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसर्‍या ठिकाणीही, दोन जणांचा मृत्यू याच कारणामुळे झाला आहे. खरं तर, हे मृत लोक स्वतःचा थंडीपासून बचाव करण्यासाठी, शेकोटी पेटवून खोलीत झोपले होते. यावेळी खोलीत धुराचे लोट पसरले. यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेतही असंच घडलं असून दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून दरवाजा तोडला. (Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation)

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना उत्तर दिल्लीच्या खेडा भागातील आहे. येथील घरात 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. घराचा दरवाजा आतून बंद होता आणि खोलीत शेकोटी जळत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा : Crime : डेटिंग अ‍ॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेबाबत काय सांगितलं?

पोलीस अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात असे समजले आहे की, थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीत शेकोटी पेटवली होती. यानंतर धुरामुळे गुदमरल्याने चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांपैकी एक 7 वर्षांचा तर दुसरा 8 वर्षांचा आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

पश्चिम दिल्लीत दोघांचा मृत्यू!

पश्चिम दिल्लीतील इंद्रपुरी भागात दोन लोक घरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या घरात शेकोटी जळत होती. बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. दोघेही मूळचे नेपाळचे होते.

हे वाचलं का?