Dhule News : धुळ्यात रीलबहाद्दर तरूणाला पोलिसांनी घडवली अद्दल, नेमकी काय शिक्षा दिली?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

dhule news police action against reel star devpur bus station dhule
dhule news police action against reel star devpur bus station dhule
social share
google news

Dhule News police action against reel star : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक मंडळी काही करायला तयार होतात. कधी सार्वजनिक ठिकाणी प्रँक करतात, तर कधी वेडेवाकडे हावभाव करून रस्त्यात डान्स करताना दिसतात. असे असंख्य व्हिडिओ आपल्याला इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतील. धुळ्यात अशाचप्रकारे एका रिलबहाद्दरने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता पोलिसांनी त्याला अद्दल घडवली आहे. (dhule news police action against reel star devpur bus station dhule)

ADVERTISEMENT

धुळे शहरातील देवपूर बस स्थानकात एका तरूणाने “पैसा फेक तमाशा देख” या गाण्यावर इंस्टाग्राम रिल्स बनवली होती. ही रिल्स बनवताना तरूणाने अश्लील हावभाव केले होते. तरूणाच्या या कृत्यावर आक्रमक होत तरूणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाला मुलींसमोर उभं करून चांगलीच अद्दल घडवली होती.

हे ही वाचा : Tunnel Rescue : 41 मजुरांचे जीव वाचवणारा ‘रिअल हिरो’, कोण आहेत रॅट मायनर मुन्ना कुरेशी?

तरूणाने मुलींसमोर “पैसा फेक तमाशा देख” या गाण्यावर अजब प्रकारचा डान्स करून रिल्स बनवली होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच तरुणाला ताब्यात घेण्यात आले. तसेच ज्या मुलींसमोर तरूणाने डान्स करून ही रिल्स बनवली होती, व ज्या ठिकाणी त्याने ही रिल्स बनवली होती. त्या ठिकाणी पोलिसांनी या तरुणाला घेऊन जात, त्या मुलींसमोर दोन्ही कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. तसेच पोलीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्याला बेडूक उड्या देखील मारायला लावल्या.

हे वाचलं का?

विशेष म्हणजे, ज्या मुलींना त्याने हावभाव करून ही रिल्स बनवली होती. त्या सर्व मुलींच्या पाया पडून त्याला माफी देखील मागायला लावली आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणाला देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील कारवाई देवपूर पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Pune Crime : समलैंगिक संबंध अन् भररस्त्यात कोयत्याने हत्या; पुण्यात तरूणासोबत काय घडलं?

तरूणावर झालेल्या या कारवाईनंतर आता इतरही रिलबहाद्दर अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवताना एकदा नक्कीच विचार करतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT