Thane : “…तर हा एकनाथ शिंदे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेन”, मुख्यमंत्री गहिवरले
ठाणे शहरातील किसननगर येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे जुन्या आठवणींनी गहिवरले.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Latest speech : ठाणे शहरातील किसननगर येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे जुन्या आठवणींनी गहिवरले. यावेळी त्यांनी क्लस्टर होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे अनुभव सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “साईराज इमारत पत्त्यासारखी कोसळली. 18 लोक त्यामध्ये मेले. त्यात महिलाही होत्या. आम्ही कार्यकर्ते म्हणून तिथं बाहेर काढण्याचं काम करत होतो. पाच-सहा दिवस आम्हाला बचाव कार्य करावं लागलं. तेव्हापासून त्या क्लस्टरच्या मागे लागलो. ते दिवस आठवताहेत. 18 निष्पाप लोकांचे बळी गेले. अशा अनेक इमारती कोसळल्या. त्या कुटुंबीयांच्या किंकाळ्या मी विसरू शकत नाही.”
मनोहर जोशी भेटायला आले…
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “नागपूरला अधिवेशन सुरू होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही जाऊन तिकडे उपोषणाला बसलो. अनेक लोक होती. तेव्हापासून ती लढाई सुरू झाली. मनोहर जोशी भेटायला आले होते. 1997 ते आज 2023 म्हणजे 27 वर्ष हा संघर्ष आम्ही केला.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आशिया खंडातील सर्वात मोठ्या, महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक अशा क्लस्टर पुनर्विकास योजनेचा ठाणे शहरात आज राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. @mieknathshinde साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ठाणे पश्चिम विभागातील किसन नगर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित… pic.twitter.com/trh5vSQh72
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) June 5, 2023
साईराज इमारत पत्त्यासारखी कोसळली
“त्यावेळी नगरसेवक होतो. दर पावसाळ्यात आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो की, आपल्या वार्डातील इमारत पडू नये. आमदार झालो, तरीही देवाकडे धावा करायचो. पण, दुर्दैवाने अतिधोकादायक इमारती पावसाळ्यात पडायच्या. आम्ही उघड्या डोळ्यांनी ते पाहत राहायचो. कशाला पाहिजे ती आमदारकी? “, असा अनुभव एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?
शिंदे म्हणाले, “सभागृहात आम्ही गेल्यानंतर सभापती, अध्यक्षांनी थांबवलं. आम्ही म्हणालो का थांबणार आम्ही आणि किती थांबणार? किती बळी पाहणार, सरकार आणखी किती बळी घेणार? याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या आमदारकीचा उपयोग काय, जर आम्ही उघड्या डोळ्यांनी मतदारसंघातील लोक मरताना पाहत असू. मग मी टोकाची भूमिका घेतली.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Mumbai politics : श्रीकांत शिंदे दारात जाऊन उद्धव ठाकरेंना देणार आव्हान!
पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही निर्णय घेणार नसाल, तर हा एकनाथ शिंदे विधानसभेच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करेन. सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. शेवटी माझ्याकडे काही पर्याय नव्हता. माझे सगळे साथी सोबती माझ्यासोबत होते. आमचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नव्हता. आणि अशा परिस्थितीत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. क्लस्टरवरून त्यावेळी माझी टिंगलही झाली. मी म्हणालो की, मला कळतंय तेवढं बोलतो. मला आता सांगायला समाधान आणि अभिमान वाटतोय की, क्लस्टरला अधिकृतपणे मान्यता मिळाली”, अशा भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT