Fact Check: लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?

निरंजन छानवाल

ADVERTISEMENT

fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth
fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth
social share
google news

Tiger Claws Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्र सरकार लंडनच्या म्युझियममधून तीन वर्षांसाठी वाघनखं (Tiger Claws) महाराष्ट्रात आणणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (hhatrapati Shivaji Maharaj) वापरलेली ही वाघनखं असल्याचं दावा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे. या दाव्यासोबतच आता प्रतिदावेही केले जाऊ लागले आहेत. नेमकं ज्या म्युझियममधून ही वाघनखं आणली जात आहे, त्या म्युझियमचं याविषयीचे काय दावे आहेत, तिथे आणखी अशी किती वाघनखं आहेत, याचा धांडोळा (Fact Check) घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. लंडनमधील म्युझियमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ही सगळी तथ्य मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. (fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth)

ADVERTISEMENT

लंडनमधील साऊथ केंग्जिंटन येथे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आहे. या वस्तुसंग्रहालयात जगभरातील विविध देशांमधून जमा करण्यात आलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी हॉल क्रमांक 41 मध्ये दक्षिण आशिया विभाग आहे. याच दक्षिण आशिया विभागाच्या शस्त्र आणि सशस्त्र सेक्शनमध्ये वाघनखं ठेवण्यात आली आहे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली असल्याचा दावा करण्यात येत आहेत.

तसं तर साऊथ केंग्जिंटनच्या म्युझियमधील या विभागात इतिहासकालीन तब्बल 1,995 शस्त्र आणि कवच आहेत. त्यातील काहीच वस्तू या म्युझियमच्या दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

ज्या वाघनखांसंदर्भात दावा करण्यात येत आहे, त्या वाघनखांसोबतच याठिकाणी औरंगजेबची तलवार, टिपू सुलतानने वापरलेल्या वस्तू, होळकर घराण्यातील काही वस्तू येथे आहेत.

लंडनमधील म्युझियममध्ये भारतातील सहा वाघनखं, पण..

पण तुम्हाला माहितीये का, या म्युझियमकडे भारतातून जमा केलेली एकूण सहा वाघनखं आहेत. त्यातील फक्त एकच वाघनख हे संग्रहालयाच्या दर्शनी भागात ठेवण्यात आले आहे आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे असल्याचा दावा केला जातो आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आता आपण साऊथ केंग्जिटनच्या म्युझियमकडून या वाघनखांबाबत काय माहिती देण्यात आलीये ते जाणून घेऊयात

या म्युझियममध्ये ज्या वस्तू दर्शनी भागात ठेवल्या जातात, त्यांची एका माहितीपत्रकावर तिथेच थोडक्यात माहिती दिलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या वाघनखासंदर्भातही येथे माहिती दिली गेली आहे. काय लिहलंय त्या माहितीत ते आपण पाहूया.

‘१६५९ मध्ये विजापूरहून शांतिवार्तेसाठी पाठवण्यात आलेल्या दुताचा कोथळा बाहेर काढत त्याच्या प्राणघातक हल्ल्यातून महान मराठा शासक शिवाजी वाचले होते. असा दावा करण्यात येतो की त्यावेळेस हीच वाघनखं वापरली गेली होती. मात्र असाच दावा इतरही अनेक वाघनखांच्याबाबतीत केला जातो.’

याशिवाय या माहितीपत्रकावर, ‘वाघनखं – १७ वे शतक, अड्रियन ग्रँट डफ यांच्याकडून भेट’ असा उल्लेखही आहे. संग्रहालयाने स्पष्टपणे असा दावा केला जातो, असं माहिती पत्रकात म्हटलेलं आहे. याउलट म्युझियममध्ये बाजूला व इतरत्र ठेवण्यात आलेल्या इतर वस्तूंबाबत मात्र स्पष्टपणे त्या कोणाशी निगडीत आहेत याचा उल्लेख केलेला आढळतो.

हे तर झालं दर्शनी भागात ठेवण्यात आलेल्या वाघनखं आणि त्याच्या माहितीसंदर्भात. आता आपण संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये या वाघनखासंदर्भात काय ऐतिहासीक माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूयात.

हे ही वाचा >> शिवजयंती उत्सवाला का असते नेहमी वाद आणि राजकारणाची किनार?

साऊथ केंग्जिटनच्या म्युझियममध्ये आधी सांगितल्याप्रमाणे दक्षिण आणि पूर्व दक्षिण आशियामधील जवळपास 1,995 शस्त्र आहेत. त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती वस्तूसंग्रहालयाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. हीच माहिती म्युझियमच्या कॅटलॉगमध्येही असते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा दावा करण्यात येत असलेल्या वाघनखांविषयी वेबसाईटच्या कॅटलॉगमध्ये काय माहिती दिली आहे ती आपण पाहू.

या वाघनखासंदर्भातील पार्श्वभूमी सांगताना त्यात म्हटलंय की, ‘ही वाघनखं जेम्स ग्रँट डफ यांच्या ताब्यात होती. ईस्ट इंडिया कंपनीचे तत्कालीन अधिकारी डफ हे 1818 मध्ये तत्कालीन सातारा प्रांताचे राजकीय मध्यस्थ होते, तेव्हा त्यांना ही वाघनखं मिळाली आहेत.

म्युझियममध्ये या वाघनखांसोबत एक लेदर केसही आहे. डफ यांनी स्कॉटलंडला परतल्यावर ते तयार करून घेतले होते. ‘शिवाजी यांची वाघनखं, ज्याने त्यांनी मुगल सरदाराला मारले होते. तत्कालीन पेशवे (पंतप्रधान) यांनी सातारा वास्तव्यादरम्यान ही वाघनखं दिला होती’, असा उल्लेख केलेला आहे.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या भेटीदरम्यान घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख या माहितीत करण्यात आलेला आहे.

शेवटचे पेशवा बाजीराव दुसरे हे 1818 मध्ये तिसऱ्या अँग्लो–मराठा युद्धादरम्यान ब्रिटिशांना शरण गेले. त्यानंतर कानपूरजवळील बिठूर येथे त्यांची रवानगी करण्यात आली होती. शक्यता आहे की, त्याचवेळी त्यांनी ग्रँट डफ यांना ही वाघनखं सोपवली असावीत. असं या माहितीत म्हटलं आहे.

हे ही वाचा >> शिवजयंती विशेष: समुद्र, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज!

160 वर्षांआधी शिवाजी महाराजांनी हीच वाघनखं वापरली होती किंवा नाही याची शहानिशा करणे शक्य झालेले नाही, असं स्पष्टपणे शेवटी म्हणण्यात आलेलं आहे. याशिवाय वेबसाईटवरील माहितीनुसार जेम्स ग्रँट डफ यांचे वंशज अड्रियन ग्रँट डफ यांनी व्हिक्टोरिया अण्ड अल्बर्ट म्युझियमला वाघनखं आणि लेदर केस भेट दिल्याचा उल्लेख आहे.

आता आपण वाघनखांविषयी जाणून घेऊयात:

स्टिलच्या धातूपासून बनवलेल्या या वाघनखांची लांबी 8.6 सेंटीमीटर असून रुंदी 3.5 सेंटीमीटर आहे. आणखी एक इंट्रेस्टिंग फॅक्ट – म्युझियमकडे अशी सहा वाघनखं आहेत. त्यापैकी दावा करण्यात येणाऱ्या वाघनखाशिवाय आणखी एका वाघनखाला फक्त चारच वक्राकार हुक्स आहेत. इतर वाघनखं ही पाच वक्राकार हुक्स असलेली आहेत.

आता आपण वस्तुसंग्रहालयातील इतर पाच वाघनखांविषयीची माहिती जाणून घेऊयात:

1- लंडनच्या भारतीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेली ही वाघनखं नंतर 1879 मध्ये व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये पाठवण्यात आली. या वाघनखाचं मूळ हे कोल्हापूर असल्याचं म्हटलं आहे. पाच वक्रकार हुक्स असलेल्या या वाघनखांविषयी अधिकची कुठलीही माहिती नाही.

2 – ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय वस्तुसंग्रहालयातून मिळालेल्या वाघनखांचं मूळ हे महाराष्ट्रातील कोल्हापूर असल्याचं म्हटलं आहे. ही वाघनखं 19व्या शतकातील असावीत याशिवाय त्यासंदर्भातील कुठलाही इतिहास माहिती नाही. 1879 मध्ये व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखं जमा करण्यात आली.

3 – ग्वालियरमध्ये मिळून आलेली ही 19व्या शतकातील वाघनखं. 1879 मध्ये ही वाघनखं सुद्धा म्युझियममध्ये जमा करण्यात आली.

4 – ईस्ट इंडिया कंपनीत प्रशासकीय अधिकारी असलेले टेलर 1829 ते 59 दरम्यान बंगालमध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडील ही वाघनखं 1875 मध्ये केंग्जिटनच्या म्युझियममध्ये आणण्यात आली.

5 – चार वक्रकार हुक्स असलेल्या दुसऱ्या वाघनखांविषयी कुठलीही ऐतेहासिक माहिती म्युझियमकडे नाही.

महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सुद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं नसल्याचा दावा केला आहे. तर सरकारने सगळ्या आरोपांचे खंडन करत वाघनखं आणण्याची जोरदार तयारी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT