Santhan : राजीव गांधींची हत्या करणाऱ्या दोषीचा राजीव गांधी रुग्णालयातच मृत्यू!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व नंतर सुटका झालेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टी सुथेंद्र्राजा ऊर्फ संथन असे या आरोपीचे नाव होते.
former pm rajiv gandhi killed dies due to heart attack in rajiv gandhi hospital rajiv gandhi assassination case chennai
social share
google news

Rajiv Gandhi Killer Died : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व नंतर सुटका झालेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टी सुथेंद्र्राजा ऊर्फ संथन (Santhan) असे या आरोपीचे नाव होते. विशेष म्हणजे ज्या राजीव गांधी (Rajiv Gandhi हत्या प्रकरणात संथन दोषी आढळला होता, त्याच राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही घटना) खूपच चर्चेत आली आहे. (former pm rajiv gandhi killed dies due to heart attack in rajiv gandhi hospital rajiv gandhi assassination case chennai) 

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात संथेन याला देखील दोषी ठरवण्यात आले होते. मात्र 1991 मध्ये राजीव गांधी हत्या प्रकरणात सुटका झालेल्या सात दोषींपैकी संथन हा एक होता. संथन हा एका गुप्तचर शाखेचा सदस्य होता. त्याचे खरे नाव टी सुथेंद्र्राजा होते. मात्र त्याला संथन नावाने ओळखले जायचे. 

हे ही वाचा : मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसचं सत्तेचं गणित बिघडलं?

श्रीलंकेचा नागरीक असलेल्या संथनला काही दिवसांपूर्वी चेन्नईमधील राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी 7.50 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रूग्णालयाचे डीन डॉ. व्हि. थेरानीराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.50 वाजताच्या सुमारास संथला हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.संथनचे यकृत निकामी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  आज पहाटे 4 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण सीपीआर देऊन त्याला पुन्हा जीवनदान देण्यात आले होते. मात्र नंतर सकाळी 7.50 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. थेरानीराजन यांनी दिली. 

हे ही वाचा : देशाला मिळाले नवे Lokpal, कोण आहेत अजय खानविलकर?

संथन हा त्या तीन आरोपींमधून एक होता. ज्यामध्ये हत्येत सहभाग असल्याच्या कारणावरून फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. यामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुरुगन आणि पेरारीवलन यांचाही समावेश होता. यानंतर तीनही आरोपींची सुटका करण्यात आली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये संथनची सुटका करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

संथनला त्रिचीच्या एका विशेष शिबिरातही ठेवण्यात आले होते. तमिळनाडून सरकारने नुकतीच मद्रास उच्च न्यायालयाला माहिती दिली होती की, श्रीलंकेने संथनला त्याच्या देशात परतण्यासाठी तात्पुरती प्रवासी कागदपत्रे दिली आहेत. मात्र मायदेशात परतण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT