Father Francis Dibrito: मराठी साहित्यिक विश्वावर शोककळा; फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन!

मुंबई तक

Father Francis Dibrito Passes Away : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो ((Father Francis Dibrito) यांचे पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठी साहित्यिक विश्वावर शोककळा; फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

point

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी साहित्यिक असून ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते

point

फादर दिब्रिटोंच्या निधनाने मराठी साहित्यिक विश्वावर आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा

Father Francis Dibrito Passes Away : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो ((Father Francis Dibrito) यांचे आज (25 जुलै) पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वसईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य धार्मिक क्षेत्रात तर होतेच सोबतच पर्यावरण, दडपशाही विरोधात आवाज उठविणारे त्यांचे सुजाण आणि सजग असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यिक विश्वावर आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे. (Former President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan and Eminent Literary and Social Activist Father Francis Dibrito passed away)

फादर फ्रान्सिस दिब्रिटो 82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी वसईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. तसेच, दिब्रिटो यांचे पार्थिव 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईत पावसाचा प्रचंड धुमाकूळ; लोकल ट्रेनचं काय झालंय?

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जीवन परिचय    

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी साहित्यिक असून ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय होते. मराठीतून विविध विषयांवर लिखाण केले आहे. ते धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले आहे.

दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल गावी झाला होता. त्यांचे शिक्षणही नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं.  फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशी राहिली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp