गावच्या जत्रेला जातानाच काळाने घातली झडप, चौघांचा दुर्दैवी मृत्यू
गावच्या यात्रेत जात असतानाच खाजगी बस (Travel Bus) आणि चारचाकी कारची (Four Wheeler) समोरासमोर धडक झाल्याची भीषण घटना घडली आहे. सांगली (Sangali) जिल्ह्यातील विटा येथील नेवरी रस्त्यावर ही घटना घडलीय.
ADVERTISEMENT
सांगली : गावच्या यात्रेत जात असतानाच खाजगी बस (Travel Bus) आणि चारचाकी कारची (Four Wheeler) समोरासमोर धडक झाल्याची भीषण घटना घडली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा येथील नेवरी रस्त्यावर ही घटना घडलीय. या अपघाताची भीषणता इतकी होती की, खाजगी बसच्या धडकेत चारचाकी कारचा अक्षरश चुराडा झाला होता. या घटनेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. (four-wheeler crushed in private bus accident four people dies one injured sangali vita incident)
ADVERTISEMENT
तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील सदानंद काशीद हे आपल्या नातेवाईकांसह मुंबईत वास्तव्यास होते. उद्या गावची यात्रा असल्याने सदानंद काशीद हे मालाड मुंबई येथून आपल्या नातेवाईकांसह चारचाकी गाडीतून (क्रमांक एम एच 47 केजी 954) गुरुवार 4 मे रोजी मध्यरात्री गावी गव्हाणसाठी निघाले होते. यावेळी सदानंद काशीद यांच्या या चारचाकी कारला (Four wheeler car) समोरून येणाऱ्या गीतांजली ट्रॅव्हल्सने (Travel Bus) समोरासमोर धडक दिली. या अपघाताची भीषणता इतकी होती की कारचा अक्षऱश चुराडा झाला होता. नेवरी रस्त्यावर विटा (Sangali Vita) हद्दीत शिवाजी नगरपासून नेवरीकडे थोड्या अंतरावर हा भीषण अपघात घडला.
हे ही वाचा : शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या
या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की अपघातातील चारचाकी फोर्ड गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात सुनिता सदानंद काशीद (61) चंद्रकांत दादोबा काशीद (62, रा. गव्हाण, ता. तासगाव) अशोक नामदेव सूर्यवंशी (64) योगेश विलास कदम चालक (35) अशी मयतांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद हे या अपघातात जखमी झाले आहेत. या भीषण अफघातानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती.
हे वाचलं का?
या अपघातानंतर विटा पोलिसांनी (vita Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. तर जखमी सदानंद काशीद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अपघातातील चार जणांचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेने काशीद कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान या प्रकरणात पोलीस (vita Police) अधिकचा तपास करतायत.
हे ही वाचा : गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT