Toll Free Pass: बाप्पाची कृपा... गणेशभक्तांना टोल माफी, असा डाऊनलोड करा फ्री Toll पास!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

गणेशभक्तांना टोल माफी, असा डाऊनलोड करा फ्री Toll पास!
गणेशभक्तांना टोल माफी, असा डाऊनलोड करा फ्री Toll पास!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफी

point

टोल फ्री पास नेमका कसा करता येणार डाऊनलोड?

point

शिंदे सरकारकडून कोकणवासियांना टोल माफी

Ganeshotsav 2024 Toll Free Entry: मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे कोकणात जात असतात. त्यामुळे त्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा GR देखील जारी करण्यात आला आहे. (ganeshotsav 2024 toll waiver for ganesha devotees going to konkan download toll free pass)

हे ही वाचा>> Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच पावला! गणेशोत्सवानिमित्त मिळणार एवढ्या सुट्ट्या... 

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त टोल माफी, GR आणि फ्री Toll पास

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत.”

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग,
परिपत्रक क्रमांक.खाक्षेस-२०२४/प्र.क्र.३२९/ रस्ते-८

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२४

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परिपत्रक

आगामी सन-२०२४ च्या गणेशोस्तव कालावधीत “कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी सुचना व निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना सदर परिपत्रकाद्वारे पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

१. सन २०२४ च्या गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दि.०५.०९.२०२४ ते दि.१९.०९.२०२४ या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम - ४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशोस्तव भाविकांना / वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

अ) याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे “गणेशोस्तव २०२४, कोकण दर्शन* अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक. चालकाचे नांव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अ प्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर. टी. ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

ब) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्हयातून येणार आहेत तेथील पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांचेकडे पासेस वरील "अ" प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. संबंधित जिल्हयातून गौरी-गणपती वाहतूकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांस लावून / चिकटवून सदरच्या बसेस रवाना होतील.

हे ही वाचा>> Gold Price Today : बाईईई...खरंच की काय, सोनं झालं स्वस्त! महिन्याच्या शेवटच्या दिवशी भाव काय?

२. ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे मार्फत दिले जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उप सचिव (खा.र.१), सार्वजनिक बांधकाम विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीकरिता सादर करावी.

३. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोस्तवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरीता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना / जाहीर प्रसिध्दी करावी.

या सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९०४१७३३०४९४१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सचिन चिवटे
उप सचिव, महाराष्ट्र शासन 

मोफत टोल पास करा डाऊनलोड View PDF

दरम्यान, जीआरसोबतच शासनाने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत टोल पास देखील दिला आहे. त्यामुळे पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यानंतर आपल्याल टोल पासही मिळवता येईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT