Ganpati Visarjan 2024 : पुणेकरांनो...गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त 'हे' प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस राहणार बंद
Pune Traffic Guildlines : पुण्यात गणपती विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पुण्याच्या मध्य भागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. तर मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस (Pune Traffic) खुले करून देण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्यात विसर्जनासाठी वाहतुक मार्गात बदल
'हे' 17 प्रमुख रस्ते राहणार बंद
शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली
Ganpati Visarjan 2024, Pune Traffic Guildlines : पुण्यात गणपती विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पुण्याच्या मध्य भागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. तर मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस (Pune Traffic) खुले करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरीकांना विसर्जन (Ganpati Visarjan) काळात नेमक्या कोणत्या रस्त्याने जाता येणार आहे? तसेच कोणते 17 रस्ते बंद राहणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ganpati visarjan 2024 pune traffic guidelines pune ganpati visarjan 17 major road will remain closed)
पुण्यात विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी 17 सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास सूरूवात होणार आहे. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे कडाडले! ''बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख...''
जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील दारूवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दुर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले स्मारक चौकातून वाहतूक वळविण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या मार्गावर गाडी पार्किग करण्यास मनाई
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. खंडुजीबाबा चौक ते वैशाली हॉटेल चौक दरम्यानच्या उपरस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
हे ही वाचा : Ganpati Visarjan 2024: गणपती विसर्जनाला विशेष लोकल सेवा, एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक
वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग
विसर्जन मिरवणुकीसाठी यंदाही वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक- विधी महाविद्यालय रस्ता- सेनापती बापट रस्ता-गणेशखिंड रस्ता- वेधशाळा चौक- संचेती रुग्णालय-अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरु रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज् चौक- मार्केट यार्ड वखार महामंडळ चौक- शिवनेरी रस्ता- सातारा रस्ता- व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चौक)-मित्रमंडळ चौक- सिंहगड रस्ता-शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलीस चौकी- म्हात्रे पूल-नळस्टॉप चौक, असा वर्तुळाकार मार्ग राहणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT