Gold Price Today: थोडं का होईना, रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! आजचा भाव काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रक्षाबंधनाच्या दिवशी आज सोन्याच्या किंमतीत थोडी का होईना घसरण झाली आहे.

point

तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

Gold-Silver Price Today : देशभरात आज रक्षाबंधन साजरा केला जात आहे. याच दरम्यान, आज सोन्याच्या किंमतीत थोडी का होईना घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडा फार दिलासा मिळणार आहे. रविवारी (18 ऑगस्ट) महाराष्ट्रात 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याची किंमत 72,770 रुपये होती. कालच्या तुलनेत आज (19 ऑगस्ट) सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट झाली आहे. चला मग आजचे सोन्याचे भाव जाणून घेऊयात. (gold price today 19th august on the occassion of raksha bandhan 2024 know the details about rate of gold silver in maharashtra)

ADVERTISEMENT

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. Goodreturns वेबसाइटनुसार, 18 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) 1150 रुपयांनी वाढला होता. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 860 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढलेला. यानुसार, 22 कॅरेट प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,700 रूपये होती. तर, 24 कॅरेट प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,770 रूपये होती. तसेच, एक किलो चांदीची किंमत 86,000 रूपये इतकी झाली होती.

हेही वाचा : Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास

त्याचबरोबर, आज (19 ऑगस्ट) 22, 24 आणि 18 कॅरेट प्रति ग्रॅम 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 10 रूपयांनी घट झाली आहे. यानुसार, आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 72, 760 रूपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 85,900 रूपये इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 690 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 560 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 690 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 560 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 770 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 570 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 720 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 600 रूपये आहे.

जळगाव

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 690 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 560 रूपये आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: कुठे उकाडा तर कुठे मुसळधार! आज तुमच्या शहरात पावसाचा अंदाज काय?

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो. 

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT