Gold Rate Today: सोन्याचा भडकाच! ग्राहकांच्या खिशाला चटका... वाचा आजचे भाव एका क्लिकवर
Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ
सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात विक्रमी वाढ नोंदवल्यानंतर चांदीचा भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता ग्राहकांच्या खिशाला कात्री बसरणार आहे. त्यामुळे आजचे (24 सप्टेंबर) सोने-चांदीचे भाव कितीने वाढले आहेत सविस्तर जाणून घेऊया. (Gold-Silver Price hike too much hike today 24 september 2024 in maharashtra know the details)
ADVERTISEMENT
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Mumbai: पहाटे 4 वाजता अचानक उडाली लोकांची झोप; मुंबईतील सर्वात थरारक Video 'तुफान' व्हायरल
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे गेला आहे.
हे वाचलं का?
Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (23 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 76,150 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 210 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 76,360 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,800 रूपये होता. जो 200 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 70,000 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 92,900 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,360 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,270 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,360 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,270 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,360 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,270 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,030 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,390 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,300 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : "तेव्हाच पीडित मुलींचा ‘बदला… पुरा’ होईल", अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल! सरकारला केला थेट सवाल
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT