Gold Price Today: सोन्याच्या भावात तुफान तेजी! जाणून घ्या आजची 1 तोळ्याची किंमत...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते.

point

सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.

point

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात.

Gold-Silver Price Today : सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असते. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा... कारण, गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले सविस्तर जाणून घेऊया. (gold-silver prices hike on Ganesh chaturthi today 08 september 2024 in maharashtra know the details)

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज रविवारी (7 सप्टेंबर 2024) सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आहे. शनिवारचे भाव कायम आहेत. पण ते प्रचंड महाग आहेत.

हेही वाचा : Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी (07 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 870 रूपयांवर पोहोचला होता. आजही हा भाव कायम आहे.तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 84,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.

नागपूर

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,870 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,660 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,830 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,990 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,690 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: आज राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT