Gold Price Today : बाईईई...खरंच की काय, सोनं झालं स्वस्त! महिन्याच्या शेवटच्या दिवशी भाव काय?

मुंबई तक

Gold Silver Rate : ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. कधी सोन्याचे दर चढे राहिले होते, तर कधी सोन्याच दर किंचित खाली आले होते. आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत. त्यामुळे थोडा का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत?
gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत.

point

सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला

point

सोन्या चांदीचे दर काय आहेत?

Gold Silver Rate : ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. कधी सोन्याचे दर चढे राहिले होते, तर कधी सोन्याच दर किंचित खाली आले होते. आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत. त्यामुळे थोडा का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत? हे जाणून घेऊयात. (gold-silver prices today 31 august 2024 in maharashtra mumbai pune know the full details)

आज, शनिवारी, 31 ऑगस्ट 2024 रोजी सोने किंचित स्वस्त झाले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 72,200 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 67,100 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 54,800 रुपयांवर पोहोचला आहे. तर आज चांदीचा दर 87,900 रुपये आहे. आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच तुम्ही जर लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने खरेदीसाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते. 

देशातील मोठ्या शहरांमधील सोन्याचे दर 

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडामध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp