Gold Price: सोनं स्वस्त! वाट कसली बघताय खरेदी करा जबरदस्त

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दसऱ्याचा सण आता तोंडावर आलेला असताना ग्राहकांसाठी एक गुड न्यूज

point

सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Rate Today : दसऱ्याचा सण आता तोंडावर आलेला असताना ग्राहकांसाठी एक गुड न्यूज आहे. सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला आहे तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. पण आता हे भाव घसले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. सोन्याच्या किंमतीतले हे बदल किती रूपयांनी झाले आहेत यावर एक नजर टाकूयात. (Gold-Silver rate cheaper before Dussehra 24 22 18 carat gold today 10 october 2024 in maharashtra what are the prices know

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (09 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 76,690 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 50 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 76,640 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,300 रूपये होता. जो 50 रूपयांनी घटला असून त्याची किंमत 70,250 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 94,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Ratan Tata Death: दुर्मिळ रत्न हरपले! रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा!

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,640 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,480 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,640 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,480 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,250 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,640 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,480 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,320 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,670 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 57,520 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: 'हीट'च्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा! पावसामुळे राज्यात थंडावा वाढणार?

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT