Ratan Tata Death: दुर्मिळ रत्न हरपले! रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा!
Ratan Tata passes Away : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री 86 व्या वर्षी निधन झालं. ब्रिच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्धक्यामुळे त्यांना काही शरीराचे त्रास जाणवत होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत 86 व्या वर्षी निधन
राज्य सरकारतर्फे एक दिवसाचा शासकीय दुखवटा
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Ratan Tata passes Away : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री 86 व्या वर्षी निधन झालं. ब्रिच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्धक्यामुळे त्यांना काही शरीराचे त्रास जाणवत होते. सोमवारी रतन टाटा यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ‘मी ठीक आहे’ अशी एक पोस्ट लिहिली होती. पण त्यांची प्रकृती अचानक ढासळत गेली. त्यानंतर त्यांनी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईत येणार आहे. रतन टाटा यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तसंच त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. (Ratan Tata Death india lost the Gem one day government mourning in honor of him in the state)
ADVERTISEMENT
राज्य सरकारतर्फे एक दिवसाचा शासकीय दुखवटा
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवारी 10 ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा असेल. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
हे वाचलं का?
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव दुपारी 3.30 वाजता अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी 4 वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी 4.30 वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.
ADVERTISEMENT
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर सकाळी 10 वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. यानंतर सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक 2 मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT