Maharashtra Weather: 'हीट'च्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा! पावसामुळे राज्यात थंडावा वाढणार?
Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस आता राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पावसामुळे राज्यात थंडावा वाढणार?
IMD चा 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट!
मुंबईत हवामानाची स्थिती कशी असणार?
Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस आता राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. अशा स्थितीत पावसाचा जोर वाढणार की ओसरणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर पावसामुळे राज्यात थंडावा वाढणार का? हिवाळ्याला सुरूवात होणार का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra weather forecast heavy rainfall october heat IMD alert report today 10 october 2024 mumbai pune)
ADVERTISEMENT
सध्या राज्यातील वातावरणात विचित्र बदल पाहायला मिळत आहेत. आधी जोरदार पाऊस, नंतर ऑक्टोबर हीट आणि आता पुन्हा पाऊस बरसू लागला आहे. अशा परिस्थितीत या वातावरणीय बदलांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
हेही वाचा : Ratan Tata Death: उद्योगपती रतन टाटा गेल्याने जगभरात शोककळा, राजकीय नेत्यांकडून हळहळ!
IMD चा 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट!
आज (10 ऑक्टोबर) पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह सोलापुरातील काही भागातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे. तर अधून-मधून पावसाची शक्यता आहे. पुण्यातील घाट विभागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज पुण्यात 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 28 अंश कमाल तर 23 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ratan Tata Death: दुर्मिळ रत्न हरपले! रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा!
मुंबईत हवामानाची स्थिती कशी असणार?
मुंबईत आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आजचे किमान तापमान 26.99 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 28.48 अंश सेल्सियस असण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. तर उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत किमान तापमान 26.4 अंश सेल्सियस असेल. तर, कमाल तापमान 30.26 अंश सेल्सियस असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT