Gold Price: सोन्याच्या दर वाढीला ब्रेक नाहीच! आजचे भाव बघून भरेल धडकीच
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीत भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला
सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला
सोन्याच्या किंमतीतील आज किती रूपयांनी झाले बदल?
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ-उतार दिसून आली. आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाही हे दर प्रचंड वाढलेले दिसत आहेत. अशातच आज (2 ऑक्टोबर 2024) सोन्याच्या किंमतीतील हे बदल किती रूपयांनी झाले आहेत यावर एक नजर टाकूयात. (Gold-Silver rate hike 24 carat gold today 2 october 2024 in maharashtra mumbai Pune nashik what are the prices)
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (01 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 76,910 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 540 रूपयांनी वाढला झाली असून याची किंमत 77,450 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,500 रूपये होता. जो 500 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 71,000 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं! 3 जणांचा जागीच मृत्यू
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,450 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,090 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,030 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,480 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,120 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra weather: धुरकट हवा, दमट वातावरण; महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट? IMD चा इशारा
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT