Govt Jobs : पदवीधरांसाठी खुशखबर! EPFO मध्ये नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज
UPSC मार्फत सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पदवीधरांसाठी खुशखबर!
EPFO मध्ये नोकरीची संधी
त्वरित करा अर्ज
EPFO Recruitment : संघ लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner - APFC) या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या एकूण 80 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळणार असून, 7 व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-10 चे आकर्षक वेतनमान लागू असणार आहे.
पात्रतेचे निकष काय?
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत 11 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. अराखीव आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. शासकीय नियमांनुसार इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 38 वर्षे (3 वर्षे सूट) आणि अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 वर्षे (5 वर्षे सूट) अशी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट : रेशमा पारधी यांचं निकृष्ट आहारावर व्हिडीओ करणं म्हणजे सरकारची बदनामी?
'असा' करा अर्ज
भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क अत्यंत नाममात्र ठेवण्यात आले असून सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25 रुपये फी आकारली जाईल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PH) आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करणे सुलभ होणार आहे.
हे ही वाचा : Reshma Pardhi Interview : रील्स केल्यानं निलंबन, मग कारवाई मागे घेतली, काय घडलं?
अर्जाची अंतिम मुदत
या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन (www.upsc.gov.in) पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीचा शेवटचा दिवस न वाट पाहता यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन वेळेत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
