Israel Hamas : ‘कॉल सुरू असतानाच…’; पती-मुलं पुण्यात, नर्ससोबत इस्रायलमध्ये काय झालं?
इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात भारतीय महिला शिजा आनंद जखमी झाली आहे. तिच्यावर दोन शस्त्रक्रियाही झाली आहे. पतीबरोबर बोलतानाच हल्ला झाल्याने आता शीजा आनंदचे कुटुंबीय तणावामध्ये आहेत.
ADVERTISEMENT
Hamas attack Israel: इस्त्रायलमध्ये काम करणारी केरळमधील परिचारिका (Nurse from Kerala) पॅलेस्टिनी दहशतवादी (Palestinian terrorists) हमासच्या हल्ल्यात ती जखमी झाल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. घरातील सदस्यांना तिने या घटनेची माहिती व्हिडीओ कॉलद्वारे (Video Call) सांगितली होती. त्यावेळी ती जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. इस्त्रायलमध्ये जखमी झालेल्या केरळच्या परिचारिकेच नाव शीजा आनंद (sheeja Anand) असून ती गेल्या सात वर्षापासून ती तिथे काम करते आहे. हमासकडून इस्त्रायलवर (Hamas-Israel) झालेल्या अचानक हल्ल्यात ती जखमी झाली असली तरी सध्या तिची परिस्थिती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
नवऱ्याबरोबर बोलतानाच
शीजा आनंद ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हमासाने हल्ला केल्यानंतर तिने तात्काळ आपल्या पतीला फोन केला. त्यावेळी तिथे झालेल्या स्फोटामुळे शीला आनंदने केलेला कॉल कट झाला होता.
शीजाची मुलं भारतात
त्यानंतरही शीजा यांच्या एका सहकाऱ्याने ती जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर शस्त्रक्रिया करुन दुसऱ्या एका शस्त्रक्रियेसाठी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शीजा आनंद यांचा पती आणि त्यांची दोन्ही मुलं भारतात राहतात तर शीजा नवरा पुणे येथे नोकरी करतात.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘मविआ’ची मुसंडी, नांदेड कृषी समितीत शेकापने उधळलला गुलाल
सायरन वाजला अन् हल्ला
केरळमधील 200 हून अधिक नागरिक बेथलेहेममधील हॉटेलमध्ये अडकले आहेत. मात्र ते सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. मल्याळम् वृत्तापत्राने दिलेल्या एका वृत्तानुसार ज्या ठिकाणी ही लोकं थांबली होती, हल्ला होण्याआधी मोठ मोठ्यान सायरन ऐकू आल्यानंतर हा हल्ला झाल्याचे अडकलेल्या नागरिकांनी सांगितले.
भारतीयांची सुटका नाही
सध्या या नागरिकांना बेथलेहेममधील हॉटेलमध्ये थांबण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते इजिप्तला रवाना होणार आहेत. तर केरळमधील आणखी काही 45 नागरिक पॅलेस्टाईनमधील हॉटेलमध्ये अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यांना आता तिथून सुरक्षित स्थळी जाण्याची परवानगी मिळाली असून लष्कराच्या सुचनेनुसार नागरिक तिथून हळू हळू मार्गक्रमण करणार आहेत.
ADVERTISEMENT
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
इस्त्रायलमध्ये अडकलेल्या केरळमधील नागरिकांची माहिती घेण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भारताच्या राजदूत यांच्याकडून माहिती घेतली आहे. यावेळी सांगण्यात आले आहे की, हमासा या दहशतवादी गटाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेही दहशतवाद्यांबरोबर दोन हात केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Hamas Israel : पॉर्न स्टार मिया खलिफाची संघर्षात उडी, हमासबद्दल काय बोलली?
हमासाचे तळ नष्ट
तीन दिवस केलेल्या या हल्ल्यात 1100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 44 सैनिकांसह इस्रायलमध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे आता इस्त्रायलनेही जोरदार कारवाई सुरु केली आहे. इस्त्रायलमध्ये सध्या 18,000 हजारपेक्षा अधिक भारतीय नागरिक राहतात, मात्र त्यांना सध्या कोणताही धोका नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT