Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून भारतात तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानंत आयसीएमआरने संशोधन करुन त्याबाबतचा अहवालही प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालातून आता आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Covid 19 : कोरोनाच्या काळात करोडो भारतीयांनी लस घेऊन या महामारीपासून स्वतःला वाचवले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून युवकांचे आकस्मिक मृत्यू (Death) होत असल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या लसीमुळे (corona vaccine) युवकांना जीव गमवावा लागत असल्याचे मत काही जण व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही म्हटले होते की, कोरोना आजारामुळे काही गंभीर त्रास होत असेल तर त्यांनी किमान एक किंवा दोन वर्षे अवजड काम करणे टाळले पाहिजे. कोरोनाच्या त्या लसीवर सर्व प्रश्न उपस्थित होत असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) याबाबत संशोधन केले आहे. (heart attack in young people in India due to corona vaccine icmr published research report)
मृत्यूची शक्यता कमी
भारतातील युवकांच्या आकस्मिक मृत्यूसाठी कोरोनाची लस जबाबदार नसल्याचा दावाही वैद्यकीय संशोधन परिषदेने केला आहे. तो दावा अभ्यासपूर्ण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संशोधनातून त्यांनी सांगितले आहे की, ही लस घेतल्यामुळे किंवा त्याचा एकच डोस घेतल्यामुळे मृत्यूची शक्यता कमी असते असंही त्यांनी सांगितले आहे.
संशोधनातून वास्तव मांडले
काही दिवसांपूर्वी मल्याळम टीव्ही अभिनेत्री डॉ. प्रिया यांच्याबरोबरच अनेक तरुणांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. या प्रकारचे मृत्यू झाल्यानंतर आयसीएमआरने संशोधन करून वास्तव परिस्थिती मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या तरुणांचा मृत्यू झाला आहे, त्यांचा मृत्यू हा कोरोना लस घेतल्यामुळे झाला नसून इतरही काही कारणं असू शकतात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ind vs Aus Final : भारत फायनलमध्ये हरला, कपिल देव म्हणाले…
लस घेतल्याने तरुणांमध्ये हृदयविकार
‘भारतातील 18 ते 45 वर्षे वयोगटाच्या व्यक्तींच्या अचानक मृत्यूची कारणे’ या विषयावर आयसीएमआरने संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्या संशोधनात कोरोनाची लस घेतल्याने तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो का, यावर त्यामध्ये संशोधन झाले आहे. या महिन्याच्या प्रारंभीच हे संशोधन पूर्ण झाले आहे. संशोधनात अशा गोष्टीही समोर आल्या आहेत की, लोक जास्त मद्यपान करतात आणि ज्यांना कोविड 19 ची लागण झाल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर होती, त्यांना मृत्यू येऊ शकतो असंही त्यामध्ये सांगण्यात आले आहे.
मृत्यूचे नेमके कारण
आयसीएमआरच्या संशोधनामध्ये 18 ते 45 वयोगटातील निरोगी लोकांचाही समावेश करण्यात आला होता. ज्या लोकांना आरोग्याच्या कोणत्याच समस्या नाहीत त्यांच्याही आरोग्याबाबत संशोधन करुन अहवाल देण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या संशोधनामध्ये अस्पष्ट कारणांमुळे तरुणांचा झालेला अचानक मृत्यूचे नेमके कारण काय त्याचा अभ्यास करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हृदयविकार टाळण्यासाठी मेहनत नको
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी आयसीएमआरने दिलेल्या संशोधनाचा दाखला देत त्यांनी सांगितले होते की, ज्यांना कोरोनाचा गंभीर आजार झाला आहे, त्यांनी हृदयविकार टाळण्यासाठी 1-2 वर्षे मेहनत करु नये असा सल्ला देण्यात आला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ind vs Aus : PM मोदी रोहित, कोहली, शमीला काय म्हणाले? ड्रेसिंग रूममधला संवाद आला समोर
ADVERTISEMENT