Mumbai Andheri Fire : मुंबईतील अंधेरीत लाकडाच्या गोदामाला मोठी आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई तक

मुंबईतील अंधाेरी परिसरात असलेल्या भंगारवाडीमध्ये लाकडाच्या गोदामाला मोठी आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऐन दिवाळीत मुंबईत मोठी दुर्घटना

point

अंधेरी परिसरात मोठी आग

point

लाकडाच्या गोदामात आग लागल्याची माहिती

Mumbai Andheri Fire Breaks Out : देशभरात सध्या दिवाळीचा सण साजरा केला जातोय. दिवे लावून, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात दिवाळीचा आनंद घेतला जातोय. मात्र मुंबईत अशातच एक नकारात्मक बातमी समोर येतेय. मुंबईच्या अंधेरी परिसरात असलेल्या एका गोडाऊनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता या परिसरात अग्निशमन दलााच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

हे ही वाचा >>Nagpur : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर विमानतळं, मी फक्त फडणवीसांनाच... देशभर धमकीचे मेल पाठवणारा सापडला, धक्कादायक माहिती समोर

 

 

अंधेरी पूर्व परिसरात असलेल्या भंगारवाडीमध्ये ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या लाकडांच्या गोदामात ही मोठी आग भडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची शक्यता आहे. या भागातील लाकडांच्या गोदामात सिलेंडरला स्फोट झाला, त्यानंतर ही घटना घडली अशी माहिती समोर आली आाहे. या भागात अनेक मोठे गोदाम असल्यानं काही वेळातच या आगीने रौद्ररुप धारण केलं. आजूबाजूच्या परिसरात असलेल्या 10 गाळ्यांनाही या आगीने काही वेळातच कवेत घेतल्याची माहिती आहे. 

 

हे ही वाचा >>Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...

 

आगीच्या या घटनेत तब्बल 8-10 सिलेंडरला स्फोट झाल्याचंही सांगण्यात येतंय. मात्र याबद्दल अजूनही खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे 6 बंब दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अद्याप तरी या घटनेतून जिवीतहाणी झाल्याची माहिती नाही, मात्र आतमध्ये काही कामगार अडकल्याची भीती आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp