Kalyan Hording Collapse: भलं मोठं होर्डिंग थेट कारवर कोसळलं, हादरवून टाकणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

भलं मोठं होर्डिंग थेट कारवर कोसळलं
भलं मोठं होर्डिंग थेट कारवर कोसळलं
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमधील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळलं

point

होर्डिंग पडल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

point

3 वाहनांचे नुकसान, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Kalyan Hording Collapse Video: कल्याण: मुंबईतील घाटकोपरमध्ये काही महिन्यांपूर्वींच एक भलंमोठं होर्डिंग कोसळून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आज (2 ऑगस्ट) मुंबईनजीकच्या कल्याण येथील सहजानंद चौकात एक भलं मोठं होर्डिंग थेट उभ्या असलेल्या गाडीवर कोसळलं ज्यामध्ये दोन जणं जखमी झाले आहेत. (huge hoarding collapses directly on car in kalyan shocking scene caught on camera)

ADVERTISEMENT

घाटकोपरमधील होर्डिंग अपघात घटनेनंतर प्रशासनाने महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी मोठमोठ्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र तशा स्वरुपाची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आणि सातत्याने होर्डिंग अपघात हे सुरूच आहेत.

हे ही वाचा>> Pimpari Chinchwad Video : बाहुली घेऊन खेळत होती, अंगावर लोखंडी गेट पडला अन्...चिमुकलीसोबत काय घडलं?

महापालिकेला शहाणपण येणार तरी कधी नागरिकांचा संतप्त सवाल?

कल्याणमधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत होर्डिंगखाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर दोन जण जखमी झालं . सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

हे वाचलं का?

सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे, या रस्त्यावर कायम वर्दळ असते. याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंग प्रकरणी कारवाई कधी होणार? असा सवाल विचारला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Pimpari Chinchwad : "लॉग आऊट नोट", असे लिहत मुलाने संपवलं जीवन,गूढ आत्महत्या!

घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते .मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

ADVERTISEMENT

कल्याण-डोंबिवली या शहरांची झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी अनेक बिल्डिंगच्या जाहिरातींसाठी मोठमोठी होर्डिंगस ही लावण्यात येत आहे. पण त्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे की, याकडे महापालिका कानाडोळा करत आहे. त्याचीच परिणिती म्हणून आज हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आता या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार का? हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT