Pooja Khedkar : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पूजा खेडकरांची पोलिसांत तक्रार, आरोप काय?
Pooj Khedkar Ias : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आता थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकरांनी पोलिसांत तशी तक्रार दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पूजा खेडकर यांचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता अहवाल
पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित
Pooja Khedkar Latest News : (दिपेश त्रिपाठी, मुंबई)अपंगत्व आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. आयएएस पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तशी तक्रार त्यांनी वाशिम पोलिसांकडे दिली आहे. (probationary IAS officer Pooja Khedkar made serious allegations against Pune Collector Suhas Diwas)
ADVERTISEMENT
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात वाशिम येथे पोलिसांना तक्रार दिली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षण घेत असतानाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे.
पूजा खेडकर यांनी कधी दिली तक्रार?
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची परवानगी घेऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> 'त्या' सर्टिफिकेटमुळे IAS पूजा खेडकरची जाणार नोकरी? UPSC मधील नियम काय?
सोमवारी (१५ जुलै) वाशिम पोलिसांचे एक पथक पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या या पथकामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त होत्या. रात्री साडेदहा वाजता पूजा खेडकरांच्या घरी गेलेले हे पथक मध्यरात्री एक वाजता बाहेर पडले होते.
हेही वाचा >> वादग्रस्त कारकीर्द, 40 कोटींची संपत्ती... IAS पूजा खेडकरांचे वडील आहेत तरी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी पूजा खेडकरांनी केली आहे.
ADVERTISEMENT
पूजा खेडकरांना तत्काळ हजर होण्याचे निर्देश
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांच्या वर्तणुकीची तक्रार सचिवांकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या अकादमीने पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केला असून, तत्काळ तातडीने हजर होण्यास सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT