Pooja Khedkar Father : दोन वेळा निलंबन अन् लाखोंची...; पूजा खेडकरांच्या वडिलांचे 'कारनामे'

मुंबई तक

ADVERTISEMENT

आयएएस पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांना दोन वेळा निलंबित करण्यात आले होते.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात अनेक लाच मागितल्याच्या तक्रारी आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकरांच्या वडिलांना दोन वेळा केले गेले होते निलंबित

point

दिलीप खेडकरांविरोधात लाच मागितल्याच्या अनेक तक्रारी

point

दिलीप खेडकर यांच्याविरोधात कुणी केलेल्या आहेत तक्रारी?

Dilip Khedkar Latest news : (ओमकार वाबळे, पुणे) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचे कारनामेही समोर आले आहेत. सेवेत असताना दिलीप खेडकर यांना दोन वेळा निलंबित करण्यात आले होते. वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

दिलीप खेडकरांच्या सेवेची कुंडली

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१), महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ च्या नियम ४ मधील उपनियम १(अ), महाराष्ट्र जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम १९८३ मधील नियमानुसार तत्कालीन विभागीय अधिकारी दिलीप खेडकर यांना २४ फेब्रुवारी २०२० रोजी चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्यात आले होते. 

दिलीप खेडकरांचे लाचेच प्रकरण काय?

जेव्हा दिलीप खेडकर हे मुंबई विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. तेव्हा 300-400 छोट्या उद्योजकांनी तक्रार दिली होती. दिलीप खेडकर मुंबई क्षेत्रातील व्यवसाय मालकांना आणि प्रतिष्ठांना त्रास देत आहेत आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत आहेत, अशी ती तक्रार होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वादग्रस्त कारकीर्द, 40 कोटींची संपत्ती... IAS पूजा खेडकरांचे वडील आहेत तरी कोण? 

६ ऑक्टोबर२०१५ रोजी मुख्यमंत्र्याकडे याबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाने या तक्रारीची दखल घेतली होती. 

पुण्यातील सुप्रभा पॉलिमर अँड पॅकेजिंगने १३ मार्च २०१९ रोजी तक्रार केली होती की, विभागीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी २० लाख रुपये मागितले आणि १३ देण्याबद्दल तडजोड झाली. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ADVERTISEMENT

कोल्हापूरमध्ये खेडकरांनी उद्योजकांकडून वसुली केल्याचे प्रकरण

दिलीप खेडकर हे जेव्हा कोल्हापूरमधील विभागीय कार्यालयात सेवेत होते, तेव्हा प्रदूषण मंडळाकडे कोल्हापूर मिल अँड टिम्बर मर्चेंटने तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षकांमार्फत ही तक्रार मिळाली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पूजा खेडकरांना मोठा दणका, नोकरी जाणार? 

१ मार्च २०१८ रोजी मिळालेल्या या तक्रारीत दिलीप खेडकर उद्योजकांकडून पैसे मागत असल्याचे आणि पाणी व वीज पुरवठा करण्यासाठीही पैसे मागत असल्याचे नमूद केलेले होते. नोटीस परत घेण्यासाठी २५ हजार ते ५० रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

साताऱ्यातही दिलीप खेडकरांनी मागितले होते पैसे

दिलीप खेडकर यांच्याविरोधात साताऱ्यातील सोना अलॉईज प्रा.लि.ने १५ मार्च २०१९ रोजी तक्रार दिली होती. त्यात म्हटले होते की, ५० हजार रुपये खेडकरांनी मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दिलीप खेडकरांकडून त्रास दिला जात आहे. 

विभागीय अधिकारी दिलीप खेडकरांची कोल्हापुरातील मैत्री कक्षातून मुंबईत बदली करण्यात आली होती. पण, त्यानंतर दिलीप खेडकरांनी पदभार स्वीकारला नव्हता. परवानगी न घेता ते ६ ते ७ महिने गैरहजर राहिले होते. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT