Govt Jobs : इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची संधी, कसा कराल अर्ज?
सरकारी बँकेत करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँक या बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे. यासाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची संधी
कसा कराल अर्ज?
Indian Bank Jobs 2026 : तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 350 जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. देशसेवा आणि प्रतिष्ठित बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित शाखेतील बी.ई./बी.टेक. पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, ज्यांनी पदव्युत्तर पदवी, MBA (Finance), CA किंवा CFA पूर्ण केले आहे, ते देखील या भरतीसाठी पात्र आहेत. शैक्षणिक पात्रतेसोबतच संबंधित क्षेत्रातील किमान 2 ते 5 वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे, जो पदाच्या श्रेणीनुसार बदलू शकतो.
हे ही वाचा : मुंबईची खबर : समुद्राचे पाणी होणार गोड, फक्त पर्यावरण मंत्रालयाची परवानगी बाकी; मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार?
'असा' करा अर्ज
अर्ज करण्यासाठी indianbank.bank.in या वेबसाईटवर जाऊन करियर हा ऑप्शन निवडावा. वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर, 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचं वय 33 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावं. नियमानुसार, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट समाविष्ट आहे. अर्जासाठी सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क केवळ 175 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : 'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
'ही' आहे शेवटची तारीख
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2026 असून, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.









