Sangli: मामीने मांत्रिकाकडे नेलं, भाच्याचा जीवच गेला; असं घडलं तरी काय?
Sangli Crimne: सांगलीतील एका 14 वर्षीय मुलाला एका मांत्रिकामुळे जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मांत्रिकाविरोधात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Sangli superstition Crime: प्रबोधिनी चिखलीकर, सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या (superstition) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. अनेक जण हे बुवाबाजीच्या नादाने अगदी निष्पाप मुलाच्या जीवावर उठले असल्याच्या देखील खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना आता सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावात घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण आहे. (innocent 14 year old boy dies after being beaten up by a exorcist a shocking incident in sangli)
भूत झपाटल्याचं म्हणत मांत्रिकाची मुलाला बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धेपायी आर्यन दीपक लांडगे (वय 14 वर्ष) या मुलाला अत्यंत दुर्दैवीपणे आपला जीव गमवावा लागला आहे. आर्यनला मागील काही दिवसांपासून सतत ताप येत होता. त्यामुळे तो तापाच्या ग्लानीत सतत बडबडत होता. काही केल्या आर्यनचा ताप कमी होत होता. त्यामुळे आर्यनच्या मामीने त्याला तिच्या वडिलांने नेलं. जे स्वत: मांत्रिक असल्याची सांगायचे.
कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर यागावी तिचे वडील आप्पासाहेब कांबळे हे राहतात. ते भूतबाधा, करणी काढणे हा सगळा प्रकार करतात. त्यांनीच आर्यनला भूतबाधा झाली असून ती काढावी लागेल असे सांगितले होते. त्यामुळेच मामीने आर्यनला शिरगूर येथे नेलं. यावेळी भूतबाधा काढण्याच्या नावाखाली त्यांनी आर्यनला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली.
हे ही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
आप्पासाहेब कांबळेंनी केलेल्या या मारहाणीत आर्यन हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्यांनी तिथून त्याच्या आईला तात्काळ फोन केला. यावेळी आर्यनने रडतरडत आपल्या मारहाण झाली असून इथून घेऊन जा असं सांगितले. मुलाने केलेल्या फोननंतर त्याच्या आईने लागलीच आर्यनला शिरगूरवरून परत आणलं.