‘कालपर्यंत जो मुलगा माझ्यासाठी रडायचा त्याने…’ Priya Singh ने अश्वजीतबद्दल काय सांगितलं?
ठाण्यातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलावर गर्लफ्रेंडच्या अंगावर कार घालण्याचा आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Priya Singh Case : ठाण्यातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलावर गर्लफ्रेंडच्या अंगावर कार घालण्याचा आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमएसआरडीसीच्या (MSRDC) व्यवस्थापकीय संचालकाचा विवाहित मुलगा अश्वजित गायकवाड याने गर्लफ्रेंड प्रिया सिंगसोबत झालेल्या वादानंतर तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, वादाचे कारण अश्वजीतचे लग्न झाले होते आणि त्याने हे गर्लफ्रेंडपासून लपवून ठेवले होते. (Instagram Influencer Priya Singh Accident Case in Thane Maharashtra Mumbai What She told About Ashwajit Gaikwad)
प्रिया सिंहसोबत नेमकं काय घडलं?
11 डिसेंबरला अश्वजीतने प्रिया सिंगला सांगितले की, तो त्याच्या एका मित्रासोबत कार्यक्रमात जाणार आहे. यावर प्रिया म्हणाली, ‘त्या रात्री मी एका कार्यक्रमात होते. मी त्याची वाट पाहत होते, पण तो आला नाही. तो जिथे होता तिथे मी त्याला भेटण्यासाठी सोमवारी पहाटे साडेचार वाजता घोडबंदर रोडवरील एका हॉटेलजवळ पोहोचले. अश्वजीत आधीच पत्नीसोबत तिथे होता. मी अचानक तिथे पोहोचेन, असा विचारही त्याने केला नसेल, यामुळे तो अस्वस्थ झाला.
वाचा : Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित
मी तिथे त्याला काहीच बोलले नाही. मी तिथून बाहेर आले आणि जोरजोरात रडू लागले. मला त्याच्याशी बोलायचं होतं. बाहेर आल्यावर त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने यावे आणि माझ्याशी याबद्दल बोलावे अशी माझी इच्छा होती.’
पुढे प्रिया सिंह म्हणाली, ‘अश्वजीत माझ्याशी विचित्र वागत होता. त्याने त्याच्या ड्रायव्हरला पाठवलं. ड्रायव्हरने मला गाडीत बसण्यास सांगितलं. मी सुरूवातीला नकार दिला पण शेवटी ड्रायव्हरसोबत गाडीत गेले. त्याने गाडी सर्व्हिस रोडवर नेली. काही वेळाने अश्वजीत गाडीजवळ आला. मी त्याला माझ्याशी एकट्यात बोलण्यास सांगितलं.