Israel-Hamas war: हमासच्या हल्लाने इस्त्रायल चिडला, सगळ्यात आधी ‘या’ देशाचा घेणार बदला?

रोहिणी ठोंबरे

पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमास पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रायलवर वारंवार हल्ला करणाऱ्या हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात सुमारे 1300 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले आहेत.

ADVERTISEMENT

Israel-Hamas war Possibility of Israel attack on Iran after Hamas attack
Israel-Hamas war Possibility of Israel attack on Iran after Hamas attack
social share
google news

Is Israel Will make Iran the first target after the Hamas attack? : पॅलेस्टाईनची कट्टरतावादी संघटना हमास (Hamas) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रायलवर वारंवार हल्ला करणाऱ्या हमासने इस्रायलवर (Hamas-Israel) पाच हजार रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यात सुमारे 1300 हून अधिक इस्रायली लोक मारले गेले आहेत. इस्रायलनेही तत्काळ कारवाई करत गाझावरील हल्ला तीव्र केला. इस्रायली सैन्याने संपूर्ण गाझाला घेरलं आहे. पण इस्रायली सूडाचा खरा चेहरा तो आहे ज्याने हमासला आर्थिक मदत केली, शस्त्रे पुरवली आणि हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले. (Israel-Hamas war Possibility of Israel attack on Iran after Hamas attack)

आता या भीषण हल्ल्यामागे हमासला इराणकडून मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वैर खूप जुने आहे. इस्रायल त्याच्या प्रत्येक शत्रूशी युद्ध करेल, पण इराणच त्यात पहिलं असणार असं दिसतंय. इराणवर इस्रायल हल्ला करण्यामागे केवळ हेच कारण दिसत नाही, तर आणखी पाच कारणे दिसत आहेत ज्यांमुळे इराणवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता युद्धतज्ज्ञांना वाटते. चला तर मग, ही पाच कारणं कोणती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Israel Hamas War: हमासने इस्रायलला पुन्हा डिवचलं, म्हणाले; ‘चुन चुन के..’

पहिलं कारण- ‘इराण, हमास आणि हिजबुल्लाला उघडपणे पाठिंबा देत आहे’

जवळपास 4 वर्षांपूर्वी लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इशारा दिला होता की, जर अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले तर त्यांना इस्रायलवर निर्दयीपणे बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले जाईल. याचा अर्थ, इराण समर्थित आतंकी संघटना हिजबुल्ला, इस्रायलवर हल्ला करण्याची संधी मिळण्यासाठी वाटच पाहत होती. खरं तर, इराणने आपला अणुकार्यक्रम बर्‍याच प्रमाणात पूर्ण केल्याचे त्यावेळी उघड झाले होते. त्याचवेळी इराणच्या लष्कराने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेशही दिले होते, पण नंतर ते मागे घेतले असल्याचे सांगितले जाते. हिजबुल्लाला इराणकडून लष्करी प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधीही मिळत आहे. त्याला सीरियातूनही पाठिंबा मिळत आहे. इराण आपल्या विरोधात सीरियाची भूमी वापरतो, असे इस्रायल सुरुवातीपासून म्हणत आहे. जुलै 2006 मध्येही हिजबुल्लाहच्या सैनिकांनी इस्रायलवर रॉकेट डागले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ला केला ज्यात सुमारे 1200 लोक मरण पावले. 160 इस्रायली सैनिकही मारले गेले. अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा आणि इतर अनेक देशांमध्ये हिजबुल्लाहवर बंदी आहे.

हिजबुल्ला हा सुरुवातीपासूनच पाश्चिमात्य आणि इस्रायलसाठी काटा आहे. मध्य आशियातही अनेक देशांना ही संघटना आवडत नाही. आता इस्रायल हिजबुल्लाच्या मुळ ठिकाणाला धडा शिकवणार हे निश्चित. त्यामुळे इराणवर हल्ला निश्चित मानला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp