Kalyan: एक फोन आणि दुर्गाडी किल्ल्याच्या कामाचे आदेश.. खासदार बाळ्या मामा अ‍ॅक्टिव्ह मोडवर!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

खासदार बाळ्या मामा अॅक्टिव्ह मोडवर!
खासदार बाळ्या मामा अॅक्टिव्ह मोडवर!
social share
google news

Durgadi Fort and Balya Mama: कल्याण: कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल (13 जून) पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासूनच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. (kalyan call from ncp sharadchandra pawar party mp suresh mhatre and an order from district collector for repair work of durgadi fort balya mama on active mode)

ADVERTISEMENT

थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन अन्...

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळील बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळला. विशेष म्हणजे पीडब्ल्यूडीकडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच आज सायंकाळच्या सुमारास पीडब्ल्यूडी अधिकारी, केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी  किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले आणि नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली.

हे ही वाचा>> Indresh kumar : "अहंकारी झाले म्हणूनच 241 जागा मिळाल्या", RSS ची भाजपवर तोफ

त्यावेळी अधिकाऱ्यांकडून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीचे महत्त्व त्यांना पटवून दिले. त्यावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोनवरच उद्यापासून तात्काळ किल्ल्याची डागडुजी सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> RSS: मोहन भागवत घेणार 'या' बड्या नेत्याची भेट, या भेटीचा अर्थ काय?

'आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. त्यामुळे आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. जर काम चांगले केले नाही तर, मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.' असा सज्जड दमही सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी यावेळी बोलताना दिला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT