Viral Video : बापरे! जळजळत्या, धगधगत्या चितेजवळच वृद्ध गेला झोपी, कारण…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

kanpur viral video old man sleeps next to burning pyre reason sad video uttar pradesh video news
kanpur viral video old man sleeps next to burning pyre reason sad video uttar pradesh video news
social share
google news

Kanpur Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खूपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती थेट चितेजवळच झोपी गेल्याचे दिसत आहे. ज्या स्मशानभूमीत (cemetery) लोकांना उभं राहायची भीती वाटते, त्या स्मशानभूमीत वृद्ध रात्रीचा झोपी गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. (kanpur viral video old man sleeps next to burning pyre reason sad video uttar pradesh video news)

ADVERTISEMENT

हिंदु धर्मात ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यावेळेस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीत
ऐरवी स्मशान शांतता असते आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतो, त्यावेळेस रडण्याचा आवाजाने स्मशानभूमी भयावह वाटत असते. इतकचं नाही तर नुसत्या स्मशानभूमीत जायचं म्हटलं तरी अनेकांचे पाय भीतीने थरथर कापतात. इतकी भयानक परिस्थिती असताना देखील या व्हिडिओत वृद्धाने दाखवलेली हिंमत पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ram Mandir : ‘फडणवीसांच्या वजनामुळे बाबरी पडली..’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हिडिओत एक स्मशानभूमी दिसत आहे. या स्मशानभूमीत एक चिता जळत आहे. या चितेच्या शेजारी एक व्यक्ती झोपला आहे. आपलं हाथरून आणि पांघरून घेऊन हा व्यक्ती बिनधांस्तपणे चितेच्या शेजारी झोपला आहे. विशेष म्हणजे या स्मशानभूमीत तो एकटाच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतक्या भीतीदायक ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती झोपल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान हा वृद्ध व्यक्ती चितेच्या शेजारी का झोपला याचे भयावह कारण ही समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कोहना पोलीस स्टेशन परिसरातील भैरव घाटाचा आहे. या भागता सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीत नागरिकांचे खुप हाल झाले आहेत. ज्या नागरीकांकडे हक्काचा निवारा आहे, त्यांना या थंडीत झोपण्यास काहीच अडचण नाही आहे. मात्र ज्यांच्या डोक्यावर छप्परच नाही आहे. त्यांची बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे व्हिडिओतील वृद्धाची देखील वाईट परिस्थिती आहे. आणि थंडीपासून आपले संरक्षण करण्यासाठी त्याला चितेच्या जळत्या लाकडाचा सहारा घ्यावा लागत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Exclusive Interview: राजीव गांधी ते मनमोहन सिंग… PM मोदी म्हणतात ‘हा’ देशातील सर्वात वाईट काळ!

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील वृद्धाची परिस्थिती पाहून अनेकांना त्यांची किव येते आहे. तर अनेकांना हा व्हिडिओ पाहुन हादरा बसला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT