Kolhapur: ‘…तर कोणाचीही गय केली जाणार नाही’, कोल्हापूरकरांना कोणी भरला दम?
Marathi News Breaking: व्हॉट्सअॅपवरील वादग्रस्त फोटो आणि स्टेट्समुळे कोल्हापुरातील वातावरण अचानक चिघळलं. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. याच सगळ्या घटनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही आदेश जारी केले आहेत.
ADVERTISEMENT

Marathi News Breaking: कोल्हापूर: सोशल मीडियावरील (Social Media) एका वादग्रस्त स्टेट्समुळे कोल्हापुरातील (Kolhapur) वातावरण हे प्रचंड तणावाचं झालं होतं. शहरातील काही भागात दगडफेकीच्या (Stone Pelting) घटना देखील घडल्या. त्यामुळे पोलिसांना (Kolhapur Police) आंदोलकांवर लाठीहल्ला देखील करावा लागला. तसंच अश्रूधूराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. या सगळ्या परिस्थितीबाबत आता जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. (kolhapur violence hindutvavadi organizations stone pelting District Collector violators restraining order will be punished)
सध्या संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मीडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
‘कोणाचीही गय केली जाणार नाही…’
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणी नंतर कोल्हापूरांना आवाहन करताना ते म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.’ असे जिल्हादंडाधिकारी रेखावार यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूरकर एवढे हिंसक झाले?
कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाविषयी व्हॉट्सअॅप स्टेटसला पोस्ट ठेवली होती. या पोस्टवरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांच्या जमावाने लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्याच्या दारात गर्दी केली. त्यानंतर घोषणाबाजी केली. हा जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक, लक्ष्मी मंडई, अकबर मोहल्ला, मुस्लिम बोर्डिंग, सीसीआर रुग्णालय परिसरात गेला. तिथे दुकान, हातगाड्या आणि घरांवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.